Happy Rose Day| File Image

Rose Day 2025:  प्रेमाचा दिवस, प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाइन डे संपूर्ण जगभारत साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा हा दिवस विविध देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये साजरा केला जातो. आपण व्हॅलेंटाइन डेबद्दल बोलणार आहोत. एक आठवडा चालणाऱ्या या पश्चिमी साजरीकरणाची सुरुवात रोज डेने होते, हा सुंदर दिवस 7 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाईल. या दिवशी तरुण जोडपी प्रेमाचे प्रतीक म्हणून गुलाब देऊन एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात, कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबापेक्षा चांगला पर्याय असूच शकत नाही. हे गुलाब विविध रंगांमध्ये असतात आणि प्रत्येक रंगाच्या गुलाबाचे वेगवेगळे अर्थ असतात. उदाहरणार्थ, लाल गुलाब प्रेम आणि रोमान्सचे प्रतीक आहे, पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक आहे, पांढरा गुलाब प्रेमाची नवीन सुरुवात किंवा विवाहाचे प्रतीक आहे, आणि काळा गुलाब प्रेमाच्या गूढ रहस्यांचे प्रतिनिधित्व करतो.

गुलाबाच्या प्रत्येक रंगाला महत्त्व 

पांढरा गुलाब प्रेमाची नवीन सुरुवात किंवा विवाहाचे प्रतीक आहे.

लाल रंग प्रेमाचे प्रतीक मानला जातो.

पिवळा गुलाब मैत्रीचे प्रतीक आहे.

काळा गुलाब ब्रेकचा प्रतीक आहे.

त्यामुळे प्रेम व्यक्त करण्यासाठी बहुतांश लोक लाल गुलाब देणं पसंत करतात.

* गुलाबाच्या फुलांचा सुगंध एक अनोखा ताजेपणा निर्माण करतो. म्हणूनच लोक आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी रोमान्सचं प्रतीक गुलाब भेट देतात.

* आज ऑनलाइन मार्केटिंगसुविधेमुळे प्रेमीयुगुलांना घरबसल्या गुलाबाचे मोठे पुष्पगुच्छ पाठवून आपले प्रेम व्यक्त करणे सोपे झाले आहे. फक्त एका क्लिकवर तुमचं प्रेम योग्य हातांपर्यंत पोहोचतं. यामुळे लाल गुलाबाची मागणी आणि लोकप्रियतेतही लक्षणीय वाढ झाली आहे.

अशा रीतीने वर्षानुवर्षे प्रेमाच्या सुंदर भावनेने, अत्यंत शांततेने आणि सुबकतेने एका हृदयाला दुसर् या हृदयाशी जोडण्यात गुलाबाच्या फुलाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे म्हणता येईल. काळ बदलला असला, तरी प्रेम ही नेहमीसारखीच सुंदर भावना आहे, जी केवळ गुलाबाच्या माध्यमातून व्यक्त होते.