Ratha Saptami 2024 Wishes in Marathi: हिंदू कॅलेंडरनुसार, रथ सप्तमी हा सण दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला साजरा केला जातो. यावर्षी 16 फेब्रुवारी 2024 रोजी सूर्य उपासनेचा हा पवित्र सण साजरा केला जात आहे. रथ सप्तमीला माघ सप्तमी, माघ जयंती, सूर्य जयंती, अचला सप्तमी आणि आरोग्य सप्तमी या नावांनी देखील ओळखले जाते. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते आणि त्यासोबतच उत्तम आरोग्याचे वरदान मिळते. रथ सप्तमीच्या दिवशी सूर्य चालिसाचे पठण केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. या दिवशी सूर्यदेवाचे दर्शन झाल्याचे मानले जाते. सूर्यदेव हा असा देव आहे जो आपल्या भक्तांना दर्शन देतो. या खास प्रसंगी, तुम्ही तुमच्या प्रियजनांना रथ सप्तमीच्या शुभेच्छा कोट्स, व्हॉट्सॲप ग्रीटिंग्ज, मेसेज, GIF च्या माध्यमातून देऊ शकता .
रथ सप्तमीचे खास शुभेच्छा संदेश , पाहा
रथ सप्तमीला सूर्य जयंती या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी सूर्यदेवाची उपासना केली जाते. असे केल्यास जीवनात सुख, शांती आणि समृद्धी लाभते आणि त्यासोबतच उत्तम आरोग्याचे वरदान मिळते. रथ सप्तमीच्या शुभ प्रसंगी तुम्ही वर दिलेले शुभेच्छा संदेश पाठवून प्रियजनांना शुभेच्छा देऊ शकता.