
Rang Panchami 2024 Wishes: रंगपंचमीचा सण ३० मार्च रोजी साजरा होणार आहे. रंगपंचमी हा सण म्हणजे देवी-देवतांची होळी असते असे समजले जाते. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. याशिवाय रंगपंचमीला श्री पंचमी आणि देव पंचमी असेही म्हणतात. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी २९ मार्च रोजी रात्री ८.२० वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी 30 मार्च रोजी रात्री 09:13 वाजता संपेल. उदया तिथी लक्षात घेता, 30 मार्च 2024 रोजी रंगपंचमीचा सण साजरा केला जाईल. या दिवशी देवांसोबत होळी खेळण्याची वेळ सकाळी 07.46 ते 09.19 अशी आहे. रंगपंचमीच्या दिवशी वातावरणात ठिकठिकाणी अबीर आणि गुलालाची उधळण होताना दिसते. या दिवशी अंगावर रंग न लावता वातावरणात रंग पसरतो. हा सण परस्पर प्रेम आणि सौहार्द दर्शवतो. दरम्यान, आम्ही रंगपंचमीचे खास संदेश घेऊन आलो आहोत.
पाहा रंगपंचमीचे खास शुभेच्छा संदेश:






शास्त्रानुसार या सणाला वाईट शक्तींवर विजय मिळवण्याचा दिवस देखील म्हटले जाते. या गुलालाने देवी-देवता प्रसन्न होतात आणि तो गुलाल परत खाली पडला की संपूर्ण वातावरण शुद्ध होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सर्व बाजूंनी नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींचा नाश होऊन सकारात्मक ऊर्जा सर्वत्र पसरते आणि देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.