Rang Panchami 2024: सनातन धर्मात रंगपंचमी हा सण होळीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच चैत्र कृष्ण पंचमीला साजरा केला जातो. यंदा रंगपंचमीचा सण ३० मार्च रोजी साजरा होणार आहे. ज्याप्रमाणे कार्तिक पौर्णिमा ही देवांची दिवाळी आहे, त्याचप्रमाणे रंगपंचमी हा सण म्हणजे देवी-देवतांची होळी असते असे समजले जाते. देशभरात रंगपंचमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. याला कृष्ण पंचमी असेही म्हणतात. कारण तो चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो. याशिवाय रंगपंचमीला श्री पंचमी आणि देव पंचमी असेही म्हणतात. रंगपंचमीच्या दिवशी वातावरणात ठिकठिकाणी अबीर आणि गुलालाची उधळण होताना दिसते. या दिवशी वातावरणात उडालेला गुलाल माणसाच्या सात्विक गुणांची वाढ करतो, असे मानले जाते. दरम्यान, आम्ही रंगपंचमीचे काही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत.
पाहा, रंगपंचमीचे खास शुभेच्छा संदेश
रंगपंचमीच्या दिवशी अबीर आणि गुलाल हवेत उधळला जातो. असे मानले जाते की, या दिवशी वातावरणात गुलाल उडवल्याने माणसाच्या सात्विक गुणांची वाढ होते. तसेच तामसिक आणि राजसिक गुण नष्ट होतात, त्यामुळे या दिवशी शरीरावर रंग न लावता वातावरणात रंग पसरवले जातात.