Close
Search

Ram Navami 2024: रामनवमी निमित्त देशभरात जोरदार तयारी; देवरहा हंस बाबा मंदिराकडून अयोध्येला पाठवला जाणार 1,11,111 किलो लाडूंचा प्रसाद

देशभरात 17 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, प्रसाद म्हणून 1,11,111 किलो लाडू अयोध्या राम मंदिरात प्रसाद म्हणून पाठवले जाणार आहेत.

सण आणि उत्सव Jyoti Kadam|
Ram Navami 2024: रामनवमी निमित्त देशभरात जोरदार तयारी; देवरहा हंस बाबा मंदिराकडून अयोध्येला पाठवला जाणार 1,11,111 किलो लाडूंचा प्रसाद
Photo Credit - Pixabay

Ram Navami 2024: देशभरात 17 एप्रिल रोजी रामनवमी साजरी केली जाणार आहे. अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतरची ही पहिली रामनवमी असणार आहे. त्यामुळे तिथले या वर्षीचे रामनवमीचे उत्सव थोडे जास्त खास असतील. त्या पार्श्वभूमीवर देवरहा हंस बाबा मंदिराकडून अयोध्येत राम मंदिराला 1,11,111 किलो लाडू प्रसाद म्हणून पाठवले जाणार आहेत. देवरहा हंस बाबा ट्रस्टचे विश्वस्त अतुल कुमार सक्सेना यांनी त्याबाबत माहिती दिली. राम मंदिरात प्रसाद म्हणून लाडू पाठवण्यावरून अतुल कुमार सक्सेना यांनी सांगितले की, काशी विश्वनाथ मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरासह दर आठवड्याला विविध मंदिरांमध्येही लाडूचा प्रसाद पाठवला जातो. देवराह हंस बाबा आश्रमकडून 22 जानेवारीलाअयोध्येत प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 40,000 किलो लाडू प्रसादासाठी पाठवले होते. (हेही वाचा :Ram Navami 2024: रामनवमीची तारीख, महत्व आणि पूजा विधी, जाणून घ्या)

झारखंडमध्ये तयारी जोरात सुरू

रामनवमी उत्सवादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव वंदना डडेल आणि रांचीचे डीजीपी अजय कुमार सिंह यांनी शनिवारी रांची येथील प्रकल्प भवन येथील सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना रामनवमीच्या मिरवणुकीवर ड्रोनच्या साह्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. धार्मिक स्थळांची सुरक्षाही मजबूत करण्यात येणार आहे. सर्व जिल्ह्यांना डीजे आणि इतर साउंड सिस्टीममधून प्रक्षोभक गाण्यांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सुरक्षा दलांसाठी भोजन, निवास आणि पाण्याची व्यवस्था करावी आणि मिरवणुकीदरम्यान वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करावी.

बिहारमध्ये प्रशासन हाय अलर्टवर

निवडणूक आचारसंहितेच्या काळात होणाऱ्या रामनवमी मिरवणुकीबाबत भोजपूर प्रशासन हाय अलर्टवर आहे. प्रशासनाकडून प्रत्येक पाऊल तत्परतेने उचलले जात आहे. अधिकाऱ्यांनी मार्ग, स्वयंसेवक, वाहने आणि मिरवणुकांच्या संख्येचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी नगर पंचायतीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांना शहर स्वच्छतेची काळजी घेण्याच्या सूचना केल्या.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change