Pulwama Attack Anniversary 2023 Messages in Marathi: जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याला आता 4 वर्ष झाले आहेत. 14 फेब्रुवारी रोजी 2019 रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला होता. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जवळपास 40 जवान शहीद झाले होते. दहशतवादी हल्ल्याच्या कटू आठवणी अजूनही भारतीयांच्या मनात तसेच आहेत. भारतानेही बदला म्हणून दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले. 26 फेब्रुवारी रोजी भारताने सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. सर्जिकल स्टाईकमध्ये दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उध्वस्त केले होते. दरम्यान, आम्ही काही संदेश घेऊन आलो आहोत, तुम्ही श्रद्धांजलीचे संदेश शेअर करून शहिदांना श्रद्धांजली वाहू शकता, पाहा
पाहा, श्रद्धांजलीचे संदेश
पुलवामात दहशतावद्यांकडून सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला होता आणि त्यामध्ये 40 जवान शहीद झाले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली होती. दरम्यान, ज्या जवानांनी प्राणाची आहुती दिली त्यांचे बलिदान न विसरता येणारे आहे.