Promise Day 2024 Messages in Marathi: व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) चा पाचवा दिवस प्रॉमिस डे (Promise Day 2024) म्हणून साजरा करण्यात येतो. व्हॅलेंटाईन वीक कपल्ससाठी खूप खास असतो. जोडपे एकमेकांना भेटवस्तू देऊन किंवा एकमेकांसाठी काहीतरी खास करून आपल्या भावना व्यक्त करतात. 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात होते. 7 ते 14 तारखेपर्यंत प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या स्वरूपात साजरा केला जातो.
11 फेब्रुवारी रोजी प्रॉमिस डे साजरा केला जातो. या दिवशी जोडीदार एकमेकांना काहीतरी वचन देतात. असे म्हणतात की वचन दिल्याने नाते मजबूत होते. जोडपे हा दिवस खूप खास पद्धतीने साजरा करतात. या दिवशी जोडपे त्यांच्या नात्यातील अनेक गोष्टींबद्दल वचने देतात. प्रॉमिस डे निमित्त तुम्ही Messages, Greetings, Whatsapp Status, Quotes शेअर करून तुमच्या जोडीदाराला द्या आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज मोफत डाऊनलोड करू शकता.
आजच्या या वचन दिनी तुला एक Promise.
माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल.
हॅप्पी प्रॉमिस डे!
पक्के प्रॉमिस तुला
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
हॅप्पी प्रॉमिस डे!
एक promise आई बाबांसाठी
आईबाबा जसे तुम्ही अतिशय
लहानपणापासून माझी काळजी घेतली
त्याच पद्धतीने मी देखील
आयुष्यभर तुमची काळजी घेईल.
हॅप्पी प्रॉमिस डे!
या प्रॉमिस डे ला माझे देखील एक प्रॉमिस आहे
परिस्थिती कितीही विपरीत असो मी
आयुष्यभर तुझ्या सोबत राहील..!
Happy Promise Day!
डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन
आणि तुझा हाती घेतलेला हात आयुष्यभर
हातात असाच राहील ओठांवरच हसू आणि
तुझी सोबत यात कधीच अंतर पडू देणार नाही..!
हॅप्पी प्रॉमिस डे!
प्रत्येकाच्या आयुष्यात वचनाला खूप महत्त्व आहे. आश्वासने दिल्यानेही विश्वास टिकतो. त्यामुळे तुम्ही दिलेले कोणतेही वचन मोडू नका. तुम्ही आपल्या जोडीदाराला वरील मेसेज पाठवून आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन देऊ शकता.