Pandharpur Wari | Representational Image (Photo Credits: File Image)

Pandharpur Ashadi Wari 2023 Schedule: पंढरपूर वारी (Pandharpur Wari ) हे  महाराष्ट्रातील आणि जगभरातील वारकरी सांप्रदायाचा जगण्याचा भाग. कित्येक वर्षांपासून चालत आलेली परंपरा. वारकरी सांप्रदाय आणि वैष्णवांचा मेळा दिंड्या पताका घेऊन वारी मार्गाने पंढरपूरला निघतो. आषाढी आणि कार्तिकी एकादसशीला पंढरपूर (Pandharpur) येथे जाऊन सावळ्या विठुरायाच्या (Lord Vittal) म्हणजेच विठ्ठल-रुक्मिणीच्या पायावर डोके ठेवतो. या वारीचेही खास वेळापत्रक असते. या वारीसाठी पंढरपूर वारी म्हणजे संत तुकाराम महाराज ( Sant Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj) अशा पालख्या निघतात. ज्या वारीतील महत्त्वाचा घटक असतात. यंदा ही वारी 10 जून 2023 पासून सुरु होणे अपेक्षीत आहे. आपण जर यंदाची वारी करण्याचा विचार करत असाल तर संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj Palkhi Yatra Marg)आणि संत ज्ञानेश्वर पालखी यात्रा (Dnyaneshwar Palkhi Yatra Marg) मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणे आवश्यक आहे.

कधी आहे पंढरपूर वारी 2023 ?

पंढरपूर वारी 2023 साठी संत तुकाराम महाराजांची पालखी 10 जूनपासून निघेल. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 11 जून 2023 पासून निघेल. पालखीसोबत निघालेली दिंडी पालखीमार्गावरुन मार्गस्त होईल. दरम्यान, ती नियोजीत वेळेनुसार अनेक ठिकाणी विसावा घेईल. मजल दरमजल करत ही वारी पंढरपूरला पोहोचेल. दरम्यान, यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या किंवा आशीर्वाद घेऊ इच्छिणाऱ्या भक्तांसाठी मुक्कामाच्या अचूक तारखा जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या तारखा खालील प्रमाणे.

संत तुकाराम महाराज पालखी यात्रा मार्गाचे संपूर्ण वेळापत्रक

Date Sant Tukaram Maharaj Palkhi Yatra Marg
June 11, 2023 Katevadi
June 20, 2023 Belvandi
June 22, 2023 Igatpuri
June 24, 2023 Akluj Mane Vidyalaya
June 25, 2023 Malinagar
June 27, 2023 Bajirao Vihar
June 28, 2023 Pandharpur

ट्विट

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग वारी वेळापत्रक

Date Sant Dnyaneshwar Palkhi Yatra Marg
June 20, 2023 Khandobacha Limb
June 24, 2023 Purandvade
June 25, 2023 Khudus Phata
June 26, 2023 Karuvachi Samadhi
June 27, 2023 Bajirao Vihar
June 28, 2023 Pandharpur
June 27, 2023 Bajirao Vihar
June 28, 2023 Pandharpur

ट्विट

आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पालखी पूर्ण झाल्यानंतर मुख्य कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे या पालखीला अनेकजण आषाढी पालखी असेही म्हणतात. या संतांचा सन्मान करणाऱ्या दोन नामांकित पालख्यांची सुरुवात पुणे जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या गावापासून होते - संत ज्ञानेश्वरांची पालखी आळंदीतून निघते, तर तुकारामांची पालखी देहू येथून निघते.