Navratri Ghatasthapana 2024 HD Images: शारदीय नवरात्री उत्सवामध्ये कलश स्थापना म्हणजेच घटस्थापनेला (Ghatasthapana 2024) विशेष महत्त्व आहे. नवरात्री (Navratri 2024) च्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जाते. यंदा 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना करण्यात येणार आहे. यंदा घटस्थापनेचा शुभ मुहूर्त 3 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 6:15 ते 7:22 पर्यंत आहे. यानंतर तुम्ही अभिजीत मुहूर्तावरही घटस्थापना स्थापना करू शकता. अभिजीत मुहूर्त सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 पर्यंत आहे.
महाराष्ट्रात नवरात्रीप्रमाणेचं घटस्थापनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी घरात किंवा मंदिरात घटस्थापना केली जाते. मातीत वेगवेगळे धान्य टाकून त्यावर एका मातीच्या मटक्याची स्थापना करण्याती प्रथा आहे. तसेच या कलशाला नऊ दिवस वेगवेगळ्या फुलांच्या माळा करून लावल्या जातात. या दिवशी लोक एकमेकांना नवरात्री उत्सव तसेच घटस्थापनेच्या शुभेच्छा देतात. तुम्ही देखील खालील नवरात्री संदेश मराठी, नवरात्री मराठी स्टेटस, नवरात्री मराठी बॅनर, घटस्थापना कोटस, घटस्थापना स्टेटस, घटस्थापना मराठी शुभेच्छा शेअर करून आपल्या मित्र-परिवारास या मंगलमय उत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Happy Navratri 2024 Advance Wishes in Marathi: नवरात्र उत्सवानिमित्त Wishes, Greetings, Images शेअर करून मित्र-परिवारास द्या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा!)
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
नवरात्र उत्सव आणि घटस्थापनेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
नवरात्री आणि घटस्थापना उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
सुख शांती आणि समृद्धीच्या मंगल कामनांसोबत
तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला
नवरात्री आणि घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा!
आजपासून सुरू होणाऱ्या
नवरात्र ऊत्सव आणि घटस्थापनेच्या
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
नवरात्री आणि घटस्थापनेच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
शारदीय नवरात्रीमध्ये मातेच्या स्वारीला म्हणजेच वाहनाला विशेष महत्त्व असते. यंदा शारदीय नवरात्रीला माता पालखीवर स्वार होऊन येणार आहे. देवी पुराणानुसार मातेची पालखीवर स्वार होणे खूप शुभ मानले जाते. महाराष्ट्रात नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्सहात साजरा होता. विवाहित महिला नवरात्रीच्या नऊ दिवस उपवास करून हे व्रत मोठ्या-भक्तीभावाने पाळतात.