Mahaparinirvan Din 2024 Quotes in Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

Mahaparinirvan Din 2024 Quotes in Marathi: भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. भीमराव आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते. 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. भीमराव आंबेडकर यांचे निधन झाले. डॉ. आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते. आंबेडकरांनी नेहमीच दलितांची स्थिती सुधारण्यासाठी अविरत कष्ट घेतले. अस्पृश्यतेसारखी दुष्ट प्रथा संपवण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. बाबासाहेबांचे अनुयायी असे मानतात की त्यांचे गुरू भगवान बुद्धांसारखे अत्यंत प्रभावी आणि सद्गुरु होते. त्यामुळे त्यांना निर्वाण प्राप्त झाले. त्यामुळेच त्यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी केली जाते.

महापरिनिर्वाण हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ मुक्ती असा होतो. याचा अर्थ 'मृत्यूनंतरचे निर्वाण'. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त होईल आणि तो जीवन चक्रातून मुक्त होईल. महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी देशभरातील लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करतात. तुम्ही देखील महापरिनिर्वाण दिनानिमित्त खालील WhatsApp Status, Greetings, Messages, Wishes च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस त्रिवार अभिवादन करू शकता.

तुमच्याकडे २ रुपये असतील,

तर १ रुपयाची भाकरी घ्या,

आणि १ रुपयाचे पुस्तक..

भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल,

तर पुस्तक ‘जगावे कसे’ हे शिकवेल..

– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Mahaparinirvan Din 2024 Quotes in Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,

तसा तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो..

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Mahaparinirvan Din 2024 Quotes in Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

पोटाची भूक तर भागवावीच,

पण एक पाऊल पुढे टाकून माणसाने,

शिक्षण घेऊन बुद्धीची भूकही भागवावी..

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Mahaparinirvan Din 2024 Quotes in Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

मोठ्या गोष्टींचे बेत करण्यापेक्षा, छोट्या गोष्टींने आरंभ करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Mahaparinirvan Din 2024 Quotes in Marathi 4 (फोटो सौजन्य - File Image)

हक्क मागून मिळत नसतो, तर त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.

– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Mahaparinirvan Din 2024 Quotes in Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

बौद्ध धर्मानुसार, निर्वाण प्राप्त करणे फार कठीण आहे. त्यासाठी अत्यंत पुण्यपूर्ण आणि धार्मिक जीवन जगावे लागते. वयाच्या 80 व्या वर्षी भगवान बुद्धांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूलाही महापरिनिर्वाण असे म्हणतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर देखील भगवान गौतम बुद्धाचे अनुयायी होते. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची तारीख देखील महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरी करण्यात येते.