Happy Navroz 2020: नौरोज़ (Nowruz) हा ईराणी नववर्षाचा ( Persian New Year) सण यंदा 20 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. दरम्यान ईराण प्रमाणेच भारत, पाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमनिस्तान, क़िरक़ीज़िस्तान, उज़्बेकिस्तान, तुर्की अशा देशांमधील लोक हा दिवस मोठ्या उत्साहात साजारा करतात. साधारण उत्तर गोलार्धात 20, 21 मार्च दरम्यान विषुवदिन असतो. या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्याने दिवस आणि रात्र समान असते. त्यामुळे याच दिवसाचं औचित्य साधर हिजरी शमसी कॅलेंडरचं नवं वर्ष या मुहूर्तापासून सुरू होते. मग तुमच्या मित्र परिवारात असणार्या खास मित्र मंडळींना 'नौरोज़ मुबारक' (Nowruz Mubarak) च्या शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबूक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यासाठी ही खास ग्रीटिंग्स, मेसेज, Wallpapers, HD Images शेअर करून ईराणी नववर्षाच्या शुभेच्छा नक्की द्या.
नवरोज हा सण प्रामुख्याने वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त साजरा केला जातो. हा निसर्ग आणि मनुष्याच्या आयुष्यातील नवचैतन्य खुलवणारा काळ असतो. सुमारे आठवडाभर ते 13 दिवस या सणानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नवरोजचं औचित्य साधत अनेक जण भूतकाळाला विसरून वर्षाची नवी सुरूवात करतात.
नौरोज़ मुबारक च्या शुभेच्छा
नौरोज़ हा उत्सव मनुष्याच्या पुर्नजीवनाचा, त्याच्या हृद्यामध्ये परिवर्तनासोबत जगाकडे पुन्हा नव्या सकारात्मकतेने पाहण्याचा दिवस असतो. त्यामुळे या दिवशी अनेक मुस्लिम बांधव नववर्षाचा पहिला दिवस मोठा उत्साहात साजरा करतात. नवे कापडे परिधान करून गोडाचे धोडाचे पदार्थ बनवून नातेवाईक आणि मित्रमंडळींना भेट देतात. यानिमित्ताने देवाकडे खास प्रार्थना देखील केली जाते.