New Year's Resolutions for 2024: नववर्षाच संकल्प करताय? 'ही' पाच पुस्तके नक्की वाचा, अल्पावधीतच दिसेल परिवर्तन
Five Inspirational Books In Marathi (Photo credit: archived, edited, representative image)

नववर्ष म्हटलं की अर्थातच अनेकांच्या संकल्पांना उधान येते. खरे तर कोणतीही चांगली गोष्ट करण्यासाठी कोणत्याही संकल्प, मुहूर्तांची मुळीच गरज नसते. तरीही अनेक लोकांना त्याची अवश्यकता वाटते. त्यामुळे तुम्ही जर अशा लोकांपैकी असाल आणि 2024 या नव्या वर्षात तुम्ही जर चांगला संकल्प करण्याचे ठरवत असाल. हा संकल्प जर वाचनाशी संबंधीत असेल तर आम्ही आपल्याला 'द सायकॉलॉजी ऑफ मनी' (The Psychology of Money), 'रिच डॅड पुअर डॅड' (Rich Dad Poor Dad), 'द अल्केमिस्ट' (The Alchemist), 'पॅपिलॉन' (Papillon), 'अॅनिमल फार्म' (Animal Farm) ही महत्त्वाची पुस्तके सूचवू इच्छितो. जी आपण वाचाल आणि आत्मसात कराल तर पुढच्या काहीच दिवसांमध्ये तुम्हाला निश्चित परविर्तन दिसू शकते. चला तर मग, घेऊया जाणून. या पुस्तकांबद्दल जी ठरतील जीवनातील परिवर्तनासाठी कारण.

मॉर्गन हाऊजेल यांचे 'पैशाचे मानसशास्त्र'

Rich Dad Poor Dad
Psychology of Money | (Photo credit: archived, edited, representative image)

तुम्ही जर पैसा, बचत, गुंतवणूक, तुमचा वेळ, आयुष्य, स्वातंत्र्य, सूख, समृद्धी, आदर, श्रीमंती यांबाबत विचार करत असाल तर शक्य तितक्या लवकर या पूस्तकाचे वाचन करा.. जे लोक हे पुस्तक वाचतील आणि त्यानुसार त्वरीत अंमलबजावणी करतील तितक्या लवकर तुमचा श्रीमंतीकडे जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. श्रीमंती आणि धनाड्य लोकांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोण आणि समान्य लोकांची श्रीमंतीकडे बघण्याची दृष्टी आणि त्यातील चकवा मॉर्गन हाऊसेल मोठ्या शिथापीने मांडतो. ज्यामुळे खरेतर 'मनी माइंडसेट' उलघडतो. (हेही वाचा, National Reading Day: मराठीतील ही पाच पुस्तके तुम्ही वाचली आहेत का?)

रॉबर्ट टी. कियोसाकी यांचे 'रिच डॅड पुअर डॅड'

Rich Dad Poor Dad
Rich Dad Poor Dad | (Photo credit: archived, edited, representative image)

तुम्ही जर सामान्य व्यक्ती आहात आणि आर्थिक साक्षरतेबद्दल जाणून घेऊ इच्छिता तर रॉबर्ट टी. कियोसाकी यांचे 'रिच डॅड पुअर डॅड' हे पुस्तक आपल्यासाठीच आहे. हे पुस्तक केवळ आर्थिक साक्षरताच देत नाही. तर ते तुम्हाला पैसे कमावण्यासाठी आणि आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रेरणाही देते. या पुस्तकाच्या माध्यमातून कियोसाकी पैसा, गुंतवणूक आणि संपत्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानसिकतेबद्दल अमूल्य धडे देतात. हे पुस्तक कालातीत परंपरागत विश्वासांना आव्हान देते आणि वाचकांना त्यांच्या आर्थिक यशाच्या दृष्टिकोनावर पुनर्विचार करण्यास प्रोत्साहित करते. (हेही वाचा, World Book Day 2023: पुस्तक, वाचन आणि जीवन; जाणून घ्या आयुष्याच्या प्रगतीचा सोपा मार्ग)

पाउलो कोएल्हो यांचे 'द अल्केमिस्ट'

The Alchemist
The Alchemist | (Photo credit: archived, edited, representative image)

स्थळ, वेळ, काळ आणि आव्हनांवर मात करत प्रतीकूल परिस्थितीत आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी हे पुस्तक तुम्हला मार्गदर्शन करते. खरं तर हे पुस्तक म्हटलं तर कादंबरी, म्हटलं तरी प्रवासवर्णन आणि म्हटलं तर आत्मनिवेदनात्मक लिखान वाटू शकतं. पण या सर्वांचा केंद्रबिंदू आत्मविश्वस हाच आहे. इतकेच नव्हे तर हे पुस्तक तुम्हाला संकेतांचा अर्थ लावण्यासही मदतगार ठरु शकते. या पुस्तकातील कथा ही सॅंटियागो या मेंढपाळ मुलाच्या प्रवासावर आधारीत आहे. जी तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याच्या परिवर्तनीय शक्तीची प्रेरणा आणि आठवण करून देण्यासाठी प्रोत्साहीत करते. (हेही वाचा, Balbharati Old Books: बालभारती जुनी पुस्तके कोठे मिळतील? घ्या जाणून)

हेन्री चॅरीरे लिखीत 'पॅपिलॉन'

Papillon
Papillon | (Photo credit: archived, edited, representative image)

हे पुस्तक म्हणजे केवळ आत्मविश्वास, संयम आणि जिद्दीच्या जोरावर केलेल्या यशाची कथा आहे. हेन्नी चॅरीरे लिखीत 'पॅपिलॉन' ही एक आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. जी आपल्याला लेखकाची सुटका, सहनशक्ती आणि मानवी आत्म्याचा विजय या अनुशंगाने विविध घटनांच्या माध्यमातून खिळवून ठेवते. लेखकाने कादंबरीच्या रुपात लिहिलेले हे चित्तथरारक संस्मरण अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करू शकणार्‍या अदम्य आत्म्याची एक मार्मिक आठवण म्हणून वाचकाला दिशा दाखवते. (हेही वाचा, World Book Day 2019: 'जागतिक पुस्तक दिन'निमित्त जाणून घ्या 'मराठीमधील वाचायलाच हवीत अशी 100 पुस्तके')

जॉर्ज ऑर्वेल यांची 'अ‍ॅनिमल फार्म'

Animal Farm
Animal Farm | (Photo credit: archived, edited, representative image)

'अ‍ॅनिमल फार्म' या कादंबरीबद्दल जगभरात इतके लिहून झाले आह की, आता त्याबद्दल नवे काय लिहायचे असा प्रश्न कोणाही सजक व्यक्तीस पडू शकतो. पण, ही कादंबरी एक असा अवकाश आहे. जो तुम्हाला एकचालुकानवर्ती कारभाराच्या दावणीला बांधून घेण्यापासून रोखते. अर्थात तुम्ही विचारी वाचक असाल तर! ही कादंबरी सामाजिक गतिशीलतेची एक उपहासात्मक रूपककथा आहे. या कादंबरीतील पात्रे ही प्राणी असले तरी ते केवळ रुपकात्मक येतात. त्यामुळे ही कादंबरी खऱ्या अर्थाने राजकीय भाष्य करते. खास करुन भारतासारख्या देशातील प्रत्येक नागरिकांनी ही कादंबरी आवर्जून वाचायला हवी. विद्यमान भारत देशामध्ये सध्या जी काही राजकीय, सामाजिक आणि आर्थिक पातळीवरती कामगिरी, वर्तन सुरु आहे त्याबाबत स्पष्टता येण्यास ही कादंबरी कारण ठरु शकते.

नवीन वर्षातील वाचनासाठी आपणास शुभेच्छा! नवीन वर्ष आपणासाठी शहाणपण, समृद्धी आणि समृद्ध कथांची विपुलता घेऊन येवो! 2024 या नव्या वर्षात पाऊल ठेवताना, आत्म-शोध आणि आत्मज्ञानाच्या प्रवासाला सुरुवात करण्याचा अभ्यासपूर्ण मार्ग पुस्तकांच्या पानांतून निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे मानवी मनातील गुंतागुंतीचा शोध, संपत्ती, शहाणपण आणि सामाजिक प्रतिमानांची रहस्ये देखील उलघडली जाऊ शकतात.