Mother's Day Special Last Minute Gift Ideas: मातृदिनानिमित्त शेवटच्या मिनिटाला आईला भेट म्हणून 'हे' भन्नाट सरप्राईजेस देऊन द्या सुखद धक्का!
Mother's Day Special Last Minute Gift Ideas: (Photo Credits: Pixabay)

Mother's Day Special Last Minute Gift Ideas: मातृदिनाच्या निमित्ताने आईला खूश करण्यासाठी आईला काय भेटवस्तू द्यावी असा प्रश्न अनेकांना पडला असेल आणि कदाचित त्याचे उत्तर शोधेपर्यंत गिफ्ट खरेदी करण्याची वेळही निघून गेली असेल. लॉकडाऊनमुळे अनेक दुकाने बंद असल्याकारणाने किंवा त्याला ठराविक वेळ मर्यादा असल्याने आईला भेटवस्तू खरेदी करता आल्याने अनेकांचा हिरमोड झाला असेल. मात्र चिंता करु नका आम्ही तुम्हाला अशा काही भन्नाट सरप्राईज आयडियाज सांगणार आहोत जे कोणत्याही गिफ्टपेक्षा कमी नसतील. हे सरप्राईज बघून तुमच्या आईला केवळ सुखद धक्काच बसेल.

आपल्या आईच्या आपल्या मुलांकडून काही तक्रारी असतात. तशा कदाचित तुमच्याकडूनही असतील त्या तक्रारी दूर करण्याचा प्रयत्न करा. बघा तुमची आई नक्कीच खूश होईल. सर्वसामान्यपणे कोणत्या असतात त्या तक्रारी आणि त्या माध्यमातून कसे द्याल आईला सरप्राईज...

  • माझ्या मुलीला काही स्वयंपाक येत नाही अशी अनेक आईंची तक्रार असते. तसे असल्यास आज युट्यूब वा पाककलेच्या पुस्तकात पाहून आईच्या नकळत तिच्यासाठी काहीतरी खास पदार्थ बनवा. जमल्यास आजचा स्वयंपाकच बनवून तिला आराम द्या.हेदेखील वाचा- Mother's Day 2021 Wishes in Marathi: मातृदिनाच्या शुभेच्छा Messages, Quotes, WhatsApp Status द्वारे देऊन आईविषयी व्यक्त करा कृतज्ञता!
  • माझा मुलगा अभ्यास करत नाही असे तुमच्या आईला वाटत असेल तर तिने न सांगता आज घरात बसून छान अभ्यास करा. व तिला उजळणी घ्यायला सांगा. तिला नक्कीच आनंद होईल.
  •  माझी मुलं सतत मोबाईलमध्ये असतात असे जर तुमच्या आईला वाटत असेल तर आजचा दिवस तुमचा मोबाईल पूर्णपणे स्विच ऑफ करा आणि आईसोबत छान वेळ घालवा. तिच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारा. तिला काय हवं, नको ते विचारा.
  •  माझा मुलगा दाढी/केस कापत नाही असं सांगणा-या आईला आज छान दाढी करून वा केस कापून सभ्य मुलासारखे तिच्यासमोर जा.
  •  माझी मुलगी नेहमी मुलांसारखे कपडे घालते असे म्हणणा-या आईसमोर छान ड्रेस घालून, तिच्या मनासारखे नटून तिच्यासमोर जा.
  • आईला नृत्य, गायन, वाचन यातील जे काही आवडतं ते तिच्यासाठी आज तुम्ही करा. तिला आवडणारा छान अभंग, भजन तिला बोलून दाखवा.

मातृदिनानिमित्ताने आईला गिफ्ट म्हणून एखादी विकतची गोष्टच घेतली पाहिजे असे नाही. याउलट तिच्या आवडीच्या गोष्टी तिच्यासाठी केला तर ती जास्त आनंद होईल. कारण आईच्या त्यागापुढे तिच्या आपल्यावरील निस्सीम प्रेमापुढे सर्वच गोष्टी व्यर्थ आहेत. त्यामुळे तिला आपण आजच्या दिवशी केवळ आनंदी ठेवू याची काळजी घ्या.