Mothers Day Messages 2022: आई हा शब्द करुणा, प्रेम, धैर्य आणि दयाळूपणा दर्शवतो. माता क्षमाशील, निस्वार्थी असतात. आई प्रत्येकाच्या जीवनाचा आधारस्तंभ असते. मातृत्व आणि मातांचा सन्मान करण्यासाठी जगभरात सर्वत्र मातृदिन साजरा केला जातो. जगाच्या काही भागांमध्ये मदर्स डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. परंतु भारत, अमेरिका आणि इतर सुमारे 40 देशांमध्ये तो 8 मे रोजी साजरा केला जातो.
आई आणि मुलाचे नाते हे जगातील सर्वात महत्वाचे आणि मौल्यवान गोष्ट आहे. प्रत्येक माणसासाठी आईचे प्रेम आणि वात्सल्य खूप महत्वाचे आहे. आई कोणत्याही स्वार्थाशिवाय मुलाची ही गरज पूर्ण करते. तसे, एक आई आपल्या मुलावर आपले संपूर्ण आयुष्य अर्पण करते. मुलाच्या सुखात आनंद आणि संकटात दुःख वाटून घेते. मुलांना त्यांच्या आईसाठी काहीतरी खास करण्याची इच्छा असते. या आईच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सन्मान करण्यासाठी एक विशेष दिवस आहे. या दिवसाला मदर्स डे म्हणतात. मदर्स डे दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यावर्षी 8 मे रोजी मातृदिन साजरा केला जात आहे. मदर्स डे निमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes, Greetings शेअर करुन आईला खास शुभेच्छा देण्यासाठी खालील ईमेज तुमच्या नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Mother's Day Gift Ideas 2022:डिनर डेटपासून ते एकत्र टॅटू काढण्यापर्यंत, साजरे करा हटके मदर्स डे)
हजारो फुलं हवीत एक माळ बनवायला
हजारो दिवे हवेत एक आरती सजवायला
हजारो थेंब हवेत एक समुद्र बनायला
पण आई एकटीच पुरे आहे
आपल्या लेकरांचे आयुष्य सावरायला!
Happy mother’s Day 2022
आई नसेल तर आयुष्य स्वर्ग कसं होईल?
आई नसेल तर मातृत्वाचा हक्क कुठं दाखवता येईल
देवा प्रत्येक आईचं रक्षण कर..
नाहीतर आमच्यासाठी दररोज प्रार्थना कोण करेल?
हॅप्पी मदर्स डे आई!!!
आईविना आयुष्य अर्थहिन आहे
प्रवास संपूर्ण पण रस्ता अपूर्ण आहे
आई असावीच कायम आशीर्वादांप्रमाणे सोबत
ती हिरकनी नसेल पाठी
तर यश देखील अपयशासारखं आहे..!
Happy mother’s Day 2022
कोठेही न मागता, भरभरून मिळालेलं दान
म्हणजे आई ...
विधात्याच्या कृपेचं निर्भेळ वरदान
म्हणजे आई...
मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
आईची ही वेडी माया
लावी वेड जीवा
जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा
माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
ज्या माऊलीने दिला मला जन्म
जिने गायली अंगाई
आज मातृदिनाच्या दिवशी
नमन करतो तुजला आई…मातृदिन शुभेच्छा
लोक मदर्स डे च्या दिवशी त्यांच्या आईला खास वाटण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात आईची भूमिका काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतात. मदर्स डे केवळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.