Matru Din 2020 Marathi Messages: आई या शब्दातच आनंद, उभारी, उत्साह, प्रेम, आपुलकी आणि माया ओतप्रोत भरलेली आहे. आई हे जणू ईश्वराचे रुप. आईचे स्थान हे प्रत्येकाच्या आयुष्यात अढळ असते. आईप्रती प्रेम, आदर, आपुलकी किंवा तिच्या बद्दल वाटणाऱ्या ज्या काही भावना आहेत. त्या व्यक्त करण्यासाठी केवळ एक दिवस नसावा असे अनेकांना वाटते. कारण आईचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मात्र मदर्स डे साजरा करण्याची पाश्चिमात्य संस्कृती आपण स्वीकारली आणि हळूहळू ती आपल्यात रुळू लागली आहे. त्यामुळे मदर्स डे (Mother's Day) निमित्त आईला गिफ्ट देणे, तिच्यासाठी ग्रिटिंग्स बनवणे, तिच्या आवडीच्या गोष्टीतून तिला आनंदीत करणे हे आपल्याकडे सर्रास व्हायला लागले. यंदा हा हळवा क्षण तुम्ही 10 मे रोजी साजरा करु शकता. Mother's Day DIY Card Ideas: मदर्स डे दिवशी यंदा आई साठी स्पेशल गिफ्ट म्हणून घरच्य घरी कशी बनवाल ग्रीटिंग कार्ड्स! (Watch Video)
जगभरात मदर्स डे हा वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. परंतु, बहुतांश देशांमध्ये हा मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. दैनंदिन जीवनात आपण आईला अनेकदा गृहित धरले जाते. राग, चिडचिड तिच्यावर व्यक्त करतो. तिने केलेल्या प्रेमाची, त्यागाची किंमत नसते असे नाही. मात्र आपण ते कधी बोलून दाखवता येत नाही. त्यामुळे आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक विशेष दिवस ठरवण्यात आला आणि तो आपण मदर्स डे म्हणून साजरा करतो. यंदा मदर्स डे निमित्त मराठमोळे संदेश, शुभेच्छापत्रं, ग्रिटींग्स, व्हॉट्सअॅप स्टिकर्स सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून शेअर करुन आईप्रती असणाऱ्या भावना व्यक्त करा.
मदर्स डे 2020 शुभेच्छा!
माझी आई..
माझी मैत्रिण..
मातृदिनाच्या शुभेच्छा!
आई
आभाळाएवढी माया जिची..
ईश्वरासमाना कृपा तिची..
मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हात तुझा मायेचा, असूदे मस्तकावरी,
झेलली आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी...
आपणा सर्वांना मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आई
आई तुझ्या मूर्तीवाणी
या जगात मूर्ती नाही..
अनमोल जन्म दिला आई तुझे
उपकार या जन्मात तरी फिटणार नाही
जागतिक मातृदिनाच्या शुभेच्छा!
ठेच लागता माझ्या पायी..
वेदना होते तिच्या हृदयी..
33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी 'आई'
जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
WhatsApp Stickers शेअर करुन द्या मदर्स डे च्या शुभेच्छा!
आजकाल WhatsApp वर शुभेच्छा देणे अगदी सोपे झाले आहे. मदर्स डे निमित्त व्हॉट्सअॅप स्टिकर्स आईला पाठवून तुम्ही तिला शुभेच्छा देऊ शकता. यासाठी गुगल प्ले स्टोअरवर Mothers Day Stickers टाईप करा आणि डाऊनलोड करुन आईला पाठवा.
आईची थोरवी अनेक लेखक, कवी, साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून मांडली आहे. तरी देखील आईचे प्रेम, कष्ट, त्याग, सेल्फलेस स्पिरिट याचे वर्णन शब्दांत करणे थोडे अवघड आहे. परंतु, यंदाच्या मदर्स डे निमित्त एक छानसा मेसेज आईला पाठवून तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा.