Makar Sankranti 2023 Dos For Good Luck: मकर संक्रांतीला या गोष्टी दान केल्यास घरात नांदेल लक्ष्मी, कधीही येणार नाही आर्थिक संकट, पाहा यादी

Makar Sankranti 2023 Dos For Good Luck: मकर संक्रांती हा सूर्यदेवाला समर्पित एक महत्त्वाचा हिंदू सण आहे. 2023 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. मकर संक्रांती हा हिंदू संस्कृतीतील एक शुभ दिवस आहे आणि देशभरात विविध उत्सवांसह साजरा केला जातो. या सणाच्या सर्वात खास बाबींपैकी एक म्हणजे गरजू आणि गरीबांनादान करणे हा आहे. त्यामुळे या दिवशी अनेक लोक वंचितांना उपयोगी वस्तू दान करतात. तुम्ही मकर संक्रांती 2023 साजरी करत असतांना तुम्हाला या सणासंदर्भातील सर्व गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. दरम्यान,मकर संक्रांतीला कोणत्या वस्तू दान केल्या जातात, जाणून घ्या 

पाहा यादी 

 तीळ 

 मकर संक्रांतीला तिळ संक्रांती असेही म्हणतात. या दिवशी तीळ दान करणे शुभ मानले जाते, तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णू, सूर्य आणि शनिदेव यांचीही तीळ अर्पण करून पूजा केली जाते. 

गुप्त लक्ष्मी / गुळाचे लाडू

गुप्त लक्ष्मीसोबत गुळाचे लाडू दान केल्याने आरोग्य चांगले राहते असे मानले जाते. तुम्ही तीळ आणि गुळाचे लाडू दान करू शकता, ज्याला गुप्त लक्ष्मी दान करणे म्हणतात.

फळे 

फळे ही सर्वांत शुभ दानांपैकी एक आहे. फळ पौष्टिक असतात आणि त्यामुळे एखाद्याचे आरोग्य सुधारते. अन्नदानापेक्षा श्रेष्ठ दान नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी फळांचे दान करणे ही एक उत्तम गोष्ट आहे. 

खिचडी

मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बरेच लोक तांदूळ आणि उडीद डाळ दान करतात. 

पतंग

मकर संक्रांतीच्या अनेकबाबींपैकी एक म्हणजे पतंग उडवणे. या दिवशी लहान मुलांमध्ये रंगीबेरंगी पतंगांचे वाटप केल्याने लहान मुलांमध्ये आनंदाचे वातावरण राहील. मकर संक्रांतीच्या दिवशी वंचित लोकांना उपयुक्त वस्तू दान करणे खूप शुभ आहे. परंतु एका चांगल्या कृत्याने तुमची सर्व पापे धुऊन निघतील या उद्देशाने दान करू नये, निर्मल मानाने दान करा, सर्वांना मकर संक्रांत २०२३ च्या हार्दिक शुभेच्छा!