Mahashivratri 2021 Wishes: प्रत्येक शिवभक्तासाठी अतिशय महत्त्वाचा आणि खास असा महाशिवरात्रीचा सण असतो. उद्या भारतभर महाशिवरात्र साजरी केली जाते. खरंतर प्रत्येक महिन्याची वद्य चतुर्दशी ही शिवरात्र असते. पण माघ वद्य चतुर्दशी ही महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते. महाशिवरात्री निमित्त देशभरातील विविध शिवमंदिरांमध्ये मोठा उत्सव आयोजित केला जातो. शंकराची पूजाअर्चा पार पडते. जत्रा भरते. त्याचबरोबर घरोघरी देखील शिवाची पूजा केली जाते. मात्र यंदा कोविड-19 संकटामुळे महाशिवरात्रीचा उत्सव अगदी साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसंच शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा तुमच्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Greetings घेऊन आलो आहोत. हे शुभेच्छा संदेश सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter), इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करा.
ऋग्वेद काळात शिव हा रुद्र या नावाने ओळखला जाई. विश्वातील संहारक शक्ती म्हणजे शिव. हा रुद्र अतिशय सामर्थ्यवान आणि सर्व प्राण्यांवर प्रेम करणार होता, असे मानले जाई. तसंच हिमालयता राहत असल्याने तो वैद्यराज म्हणूनही प्रसिद्ध होता. त्याचबरोबर शंकराची 'निलकंठ', 'जटाधारी', 'गिरीश' अशी अनेक नावे देखील प्रचलित झाली.
महाशिवरात्री शुभेच्छा!
शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती,
ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी,
आपल्या जीवनाची होवो एक नवी आणि चांगली सुरुवात,
हीच शंकराकडे प्रार्थना…
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व जग ज्याच्या शरणी आहे..
त्या भगवान शंकराला नमन आहे,
भगवान शंकराच्या चरणांची होऊया धूळ,
चला देवाला वाहूया श्रद्धेचं फूल…
हर हर महादेव!
शुभ महाशिवरात्री!
शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा...
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिव शंकरांचा महिमा अपरंपार!
शिव करतात सर्वांचा उद्धार,
त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी
आनंदच आनंद देवो…
महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
दुःख दारिद्रय नष्ट होवो
सुख समृद्धी दारी येवो
या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो…
महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!
विशेष म्हणजे महाशिवरात्री निमित्त अनेक शिवभक्त उपवास धरतात. शिवरात्रीला शंकराची पूजा करुन दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडल जातो. मात्र यंदा कोविड-19 संकटात गर्दी करणे टाळणे आवश्या आहे.