Mahashivratri 2021 Messages: शंकर भगवान रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला 'महाशिवरात्री' (Maha Shivratri) असे म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. यंदा ही महाशिवरात्र 11 मार्च रोजी आली आहे. या दिवशी शंकराची पूजा करून, बेल अर्पण करुन आणि दुधाचा अभिषेक करुन त्याची पूजा करतात. यंदाही महाशिवरात्रीसाठी शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे सर्वांना एकत्र जमून हा सण साजरा करण्यावर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे हताश न होता आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊ शकता.
महाशिवरात्री निमित्त मेसेजेस (Messages), व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), फेसबुक (Facebook), डिजिटल ग्रिटींग्स (Greetings) च्या माध्यमातून तुम्ही एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता. या खास दिवसासाठी आपल्या मित्रपरिवाराला, आप्तलगांना पाठविण्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश:
शिव शंभूचा महिमा आहे अपरंपार
महाशिवरात्रीस भक्ताच्या आनंदास न उरे पारावार
आज सर्वांनी मिळून करुया शिवाची भक्ती
ज्याने संकटांशी लढण्यास मिळेल तुम्हांस शक्ती
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
हर हर महादेव या जयघोषाने
उजळून जाऊ दे ही दुनिया सारी
शिव चरणी लीन होण्यासाठी
महाशिवरात्री करू साजरी
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
हेदेखील वाचा- Mahashivratri 2021: जाणून घ्या नक्की कशी करावी महाशिवरात्री पूजा; भगवान शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी 'या' गोष्टींचे पालन करा
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्र माथां मुकुटी झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदुःखहारी । तुजवीण शंभो मज कोण तारी ॥
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
सारे विश्व ज्याला शरण आले
त्याच्या चरणस्पर्शाने भक्त धन्य झाले
आले हो आले
महाशिवरात्रीस महादेव तुमच्या दारी आले
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
शिव सत्य आहे,
शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे,
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवतत्त्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा `ॐ नम: शिवाय’ हा नामजप जास्तीत जास्त करावा. घरात भांडणतंटा न करता प्रसन्न वातावरण असावे. जेणेकरुन घरात शिवशंकराचा वास राहील.