Maharashtra Krishi Din

महाराष्ट्रात 1 जुलै हा दिवस कृषी दिन (Maharashtra Krishi Din) म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, राज्याच्या हरीत क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रात दिलेल्या बहुमोल योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 1 जुलै या दिवशी वसंतराव नाईक यांची जयंती (Vasantrao Naik Jayanti) असते. या जयंतीच्या औचित्याने महाराष्ट्र कृषी दिन (Maharashtra Krishi Din 2021) साजरा केला जातो. या दिवशी राज्यभरात विविध संस्था, संघटना आणि कृषी क्षेत्राशी संबंधीत घटक हे विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. या दिवशी अनेक शेतकरी, कृषी क्षेत्राशी संबंधीत लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. आपणही HD Images, Wishes, Messages, Whatsapp Status शेअर करून महाराष्ट्र कृषी दिन शुभेच्छा एकमेकांना देऊ शकता. त्यासाठी इथे दिलेल्या इमेजेस आपणास डाऊनलोड करता येऊ शकतील.

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राची चांगली जाण असलेल्या मोजक्याच मुख्यमंत्र्यांपैकी एक मुख्यमंत्री अशी वसंतराव नाईक यांची ओळक होती. 1965 मध्ये एकदा पुणे येथील शनिवारवाड्यावरील कार्यक्रमात बोलताना ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे विधान केले होते. त्यानंतर ते केवळ विधान करुनच थांबले नाहीत तर त्यांनी त्या दृष्टीने पावलेही टाकली. पुढच्या काहीकाळात महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. (हेही वाचा, Maharashtra Krishi Din 2021: महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो आणि का? जाणून घ्या माहिती आणि इतिहास)

महाराष्ट्र कृषी दिन

Maharashtra Krishi Din

महाराष्ट्र कृषी दिन

Maharashtra Krishi Din

महाराष्ट्र कृषी दिन

Maharashtra Krishi Din

महाराष्ट्र कृषी दिन

Maharashtra Krishi Din

महाराष्ट्र कृषी दिन

Maharashtra Krishi Din

महाराष्ट्र कृषी दिन

 

वसंतराव नाईक हे ज्या काळात महाराष्ट्रातील शेतीशी संबंधीत काम करत होते. तो काळ अत्यंत प्रतिकूल होत. अत्यंत तोकडे महसूली उत्पन्न, साधनसामग्रीचा अभाव अशा एक ना अनेक गोष्टी असतानाही वसंतराव नाईक काम करत राहिले. राज्यात कृषीक्रांती घडविण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. 1972 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. हा दुष्काल वसंतराव नाईक यांनी एक आव्हान आणि संधी म्हणून स्वीकारला. या काळात भरीव काम करुन त्यांनी दुष्काळ निवारणाचा शाश्वत मार्ग जनतेला दाखवला. कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केली. रोजगार हमी सारख्या योजनांच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या हाताला काम देणारा मार्ग दाखवला.