Maharashtra Bank holidays in January 2025: सध्या नव्या वर्षातील पहिला मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2025) सण जवळ येत आहे. मंगळवार दिनांक 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा होणार आहे. अशात मकर संक्रांतीदिवशी बँका बंद आहेत का? किंवा या दिवशी सुट्टी आहे का? याबाबत संभ्रम आहे. तर दरवर्षी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संपूर्ण भारतातील सर्व सार्वजनिक आणि खाजगी बँकांसाठी सुट्टीचे कॅलेंडर जारी करते. आरबीआयने प्रकाशित केलेल्या वार्षिक सुट्टीच्या कॅलेंडरच्या यादीनुसार, देशातील फक्त काही ठिकाणी 14 जानेवारी रोजी खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही बँका बंद राहतील. मध्यवर्ती बँकेच्या कॅलेंडरनुसार 13 जानेवारीला सुट्टी नाही. महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रात मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारी रोजी सुट्टी असणार नाही.
जानेवारी महिन्यात सण, प्रादेशिक आणि राष्ट्रीय सुट्ट्यांव्यतिरिक्त, सर्व बँका (सरकारी आणि खाजगी) प्रत्येक महिन्याप्रमाणे दोन शनिवार आणि चार रविवारी बंद राहतील. भारतातील प्रत्येक राज्यामध्ये बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. यंदा महाराष्ट्र सरकारने वर्षात एकूण 25 सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. 24 सार्वजनिक सुट्ट्यांव्यतिरिक्त 23 ऑक्टोबर 2025 (गुरुवार) रोजी भाऊबीज ही काही संस्थांसाठी अतिरिक्त सुट्टी म्हणून घोषित केली आहे. यामध्येही 14 जानेवारी रोजी सुट्टी देण्यात आलेली नाही. (हेही वाचा: Pune Empress Garden Flower Show 2025: पुण्यात 24 ते 27 जानेवारी दरम्यान एम्प्रेस गार्डन फ्लॉवर शोचे आयोजन; देशभरातील नर्सरी मालक होणार सहभागी)
14 जानेवारी रोजी बँक बंद असलेल्या शहरांची यादी-
अहमदाबाद
बेंगळुरू
भुवनेश्वर
चेन्नई
गंगटोक
गुवाहाटी
हैदराबाद
इटानगर
कानपूर
लखनौ
देशातील अनेक राज्यांमध्ये लोहरी आणि मकर संक्रांती उत्साहात साजरी केली जाते. मात्र आरबीआय कॅलेंडरमध्ये 14 जानेवारी रोजी सुट्टीसाठी वरील शहरे सोडून, इतर शहरांचा उल्लेख नसल्यामुळे बँका त्या राज्यांमध्ये 13 आणि 14 जानेवारीला नेहमीप्रमाणेच खुल्या राहतील. जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्रात दुसरा आणि चौथा शनिवार व सर्व रविवार सोडून केवळ एक सार्वजनिक सुट्टी आहे, ती म्हणजे प्रजासत्ताक दिन, 26 जानेवारी. परंतु हा दिवसही रविवारी येत आहे. दरम्यान, यावर्षी एकूण 52 रविवार आहेत. तसेच, दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारच्या स्वरुपात 26 शनिवार सुट्ट्या असतील. सामान्य सरकारी कर्मचाऱ्याला 2025 मध्ये अंदाजे 98-100 सुट्ट्या (सार्वजनिक, रविवार आणि शनिवारसह) मिळतील.