लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal) गणेश भक्तांचे आभार मानले आहेत. मुंबईच्या लालबाग (Lalbaug) येथील या मंडळाच्या गणपतीचा 91 व गणेशोत्सव यंदा पार पडला. शनिवार दिनांक 7 सप्टेंबर पासून सुरु झालेल्या या उत्सवाची सांगता (Lalbaugcha Raja News) शनिवारी (17 सप्टेंबर 2024) या दिवशी मोठ्या उत्साहात झाली. या काळात उत्सव निर्विघ्नपणे संपन्न करण्यासाठी सहकार्य केलेबद्दल मंडळाने सर्व गणेश भक्त, पोलीस यंत्रणा, मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि इतर सर्वांचे जाहीर आभार मानले आहेत. याबाबत मंडळाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया मंच एक्स (पुर्वीचे ट्विटर) द्वारे एक पोस्ट सामायिक केली आहे.
लालबागच्या राजा गणेशोत्सवाचे यंदाचे 91 वे वर्ष
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एक्स हँडलवरुन शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने यंदाही लालबागच्या राजाचा 91वा गणेशोत्सव शनिवार दि. 7 सप्टेंबर ते मंगळवार दि. 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत मोठ्या जल्लोषात - उत्साहात आणि मांगल्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हा उत्सव निर्विघ्नपणे संपन्न करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊन सहकार्य करणारे मुंबई पोलीस प्रशासनातील मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, कायदा व सुव्यवस्था सह आयुक्त सत्यनारायण, अपर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) अनिल पारस्कर, पोलीस उपायुक्त (परिमंडळ - ४) प्रशांत कदम, सहाय्यक पोलिस आयुक्त कुमुद कदम, काळाचौकी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष श्रीधनकर, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक लांडगे तसेच काळाचौकी पोलीस स्टेशन, भायखळा पोलीस स्टेशन, आग्रीपाडा पोलीस स्टेशन, नागपाडा पोलीस स्टेशन, व्ही. पी. मार्ग पोलीस स्टेशन, दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे आणि सर्व कर्मचारी बंधू-भगिनींचे मनःपूर्वक जाहीर आभार. (हेही वाचा, Lalbaugcha Raja Visarjan 2024: लालबागचा राजा विसर्जन;गिरगाव चौपाटीवर साश्रूपूर्ण नयनांनी बाप्पाला निरोप)
लालबागचा राजा गणेशोत्सव संपन्न
जाहीर आभार :
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विद्यमाने यंदाही लालबागच्या राजाचा ९१वा गणेशोत्सव शनिवार दि. ७ सप्टेंबर ते मंगळवार दि.१७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत मोठ्या जल्लोषात-उत्साहात आणि मांगल्यपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
हा उत्सव निर्विघ्नपणे संपन्न करण्यासाठी… pic.twitter.com/1BOYZUs9aC
— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) September 20, 2024
दरम्यान, याच पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, बृहन्मुंबई महानगर पालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त अमित सैनी, उपायुक्त प्रशांत सपकाळे, एफ साऊथ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील, सहाय्यक अभियंता प्रशांत बने, तसेच महापालिका प्रशासनातील सर्वच कर्मचारी बंधू-भगिनींचे मनःपूर्वक जाहीर आभार. त्याचप्रमाणे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणारे सर्व भाविक तसेच विसर्जन मार्गावरील सर्व भाविक आणि विभागातील सर्व रहिवाशी, वर्गणीदार देणगीदार, व्यापारीवर्ग, कोळी महिला, हितचिंतक, राज्य प्रशासन, विभागातील मंडळे, सामाजिक संस्था, प्रिंट व डिजिटल माध्यमे व त्यांचे प्रतिनिधी आणि समस्त नागरिकांचे मनःपूर्वक जाहीर आभार.