Lal Bahadur Shastri Jayanti 2024: देशात 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जात असताना, त्याच दिवशी देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंतीही साजरी केली जाते. शास्त्रीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी मुगलसराय, उत्तर प्रदेश येथे झाला होता. शास्त्री यांचे पूर्ण नाव लाल बहादूर श्रीवास्तव होते, तर त्यांच्या वडिलांचे नाव शारदा प्रसाद आणि आईचे नाव रामदुलारी देवी होते. आपले संपूर्ण आयुष्य साधेपणाने जगणाऱ्या शास्त्री यांचे शालेय शिक्षण हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये पूर्ण झाले, त्यानंतर त्यांनी काशी विद्यापिठातून पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांना शास्त्री ही पदवी मिळाली. ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले आणि त्यांच्या मृत्यूनंतर शास्त्री यांच्याकडे पंतप्रधानपद सोपवण्यात आले होते. लाल बहादूर शास्त्रींनी 'जय जवान, जय किसान'चा नारा देशातील जनतेला दिला. शास्त्री राष्ट्रपिता महात्मा गांधींसोबत ब्रिटिशांविरुद्धच्या असहकार चळवळीत सामील झाले, ज्यासाठी त्यांनी काही काळ तुरुंगात घालवले. त्यांच्या जयंतीनिमित्त लोक त्यांना स्मरण करतात आणि त्यांना श्रद्धांजली वाहतात, म्हणून तुम्ही हे मराठी कोट्स, व्हॉट्सॲप संदेश, GIF ग्रीटिंग्सद्वारे तुमच्या शुभेच्छा देखील पाठवू शकता. हे देखील वाचा: 'Ring Of Fire' Solar Eclipse 2024: 2 ऑक्टोबरला दिसणार दुर्मिळ 'रिंग ऑफ फायर' सूर्यग्रहण, जाणून घ्या, काय आहे त्याची खासियत
स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरिबांच्या सेवेसाठी वाहून घेतले. ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. शास्त्री 1920 मध्ये ब्रिटीश सरकारविरुद्ध सुरू असलेल्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. 1921 मध्ये असहकार आंदोलन, 1930 मध्ये दांडी मार्च आणि 1842 मध्ये भारत छोडो आंदोलनातही त्यांचा सहभाग होता. त्यामुळे जेव्हा जेव्हा भारताच्या शूर सुपुत्रांचे नाव घेतले जाते तेव्हा शास्त्रींचा उल्लेख केला जातो.