Krishna Janmashtami 2022 Messages: भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात अष्टमी तिथीला झाला होता. त्यामुळे श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. श्रावण कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा केला जातो. यंदा 18 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव म्हणजेच जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. जन्माष्टमीला बाळकृष्णाची पूजा केली जाते. उपवासही धरला जातो. भगवान श्री कृष्णाला विष्णूचा आठवा अवतार मानला जातो आणि भगवान विष्णू सृष्टीचे रचेईता आहेत. त्यामुळे कृष्ण जन्मोत्सव हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. भारतात बहुंताश ठिकाणी कृष्णाच्या जन्माचा सोहळा पारंंपारिक पद्धतीने घरी साजरा करण्याची पद्धत आहे. या सुंदर उत्सवाचे विशेष संदेश पत्र आम्ही तयार केले आहेत, तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणी, नातेवाईक व सर्व प्रियजनांंना भगवान कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन आनंदात उत्सव साजरा करू शकतात. मराठी शुभेच्छापत्र, Wishes, Whatsapp Status, Messagesच्या माध्यमातून तुम्ही संदेश पाठवू शकतात. [हे देखील वाचा: Shri Krishna Janmashtami 2022 Date: 18 की 19 ऑगस्ट? जाणून घ्या श्री कृष्ण जन्माष्टमीची नेमकी तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी, पाहा]
पाहा, शुभेच्छा संदेश
2022 मध्ये भाद्रपदाच्या कृष्ण पक्षाची अष्टमी तिथी 18 ऑगस्ट रोजी रात्री 9.20 पासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी रात्री 10.59 पर्यंत राहील. दरम्यान, गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी कृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा केला जाणार आहे.