Journalist Day (Photo Credits: PixaBay)

Journalist Day 2020 Wishes: लोकशाहीची चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणा-या पत्रकारांचा आजचा दिवस विशेष आहेत. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने 'पत्रकार दिन' (Journalist Day) हा 6 जानेवारीला घोषित केला आहे. महाराष्ट्र राज्यात हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले होते. जुलै 1840 मध्ये दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. जगाच्या प्रत्येक कोनातील इत्यंभुत माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम पत्रकार बांधव गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. आपली तहानभूक विसरुन पत्रकार बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता देशातील प्रत्येक घडामोडीबद्दल सविस्तर माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवतात. अशा या धाडसी पत्रकारितेला आणि हे काम अगदी निष्ठेने पार पाडणा-यांचा सन्मान करण्याचा आजचा दिवस.

पत्रकारांसाठी विशेष समजल्या जाणा-या या दिवसाच्या आपल्या समस्त पत्रकार बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळ्या HD Images:

Journalist Day HD Images Wishes (Photo Credits: File)
Journalist Day HD Images Wishes (Photo Credits: File)

हेदेखील वाचा- World Press Freedom Day 2019: जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का करतात साजरा? जाणून घ्या महत्त्व

Journalist Day HD Images Wishes (Photo Credits: File)
Journalist Day HD Images Wishes (Photo Credits: File)
Journalist Day HD Images Wishes (Photo Credits: File)

 

6 जानेवारी या दर्पण दिनांच्या पार्श्वभूमीवर आणि मराठी पत्रकार दिनाच्या दिवशी आपण सर्वांनी सिंहावलोकन करुन पुढची वाटचाल करण्याची दिशा ठरवावी लागेल. पत्रकार बांधवांना पत्रकार दिनांच्या हार्दिक शुभेच्छा…