Mehendi Design 2024

Janmashtami 2024 Mehendi Design: जगाचे निर्माता मानले जाणारे  भगवान विष्णूचा आठवा अवतार भगवान श्री कृष्ण यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रात झाला होता, म्हणून त्यांची जयंती दरवर्षी या शुभदिनी साजरी केली जाते. तिथी श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. नटखट कृष्णाची जयंती (कृष्ण जन्माष्टमी) देशभरात भक्तीभावाने साजरी होत असली तरी मथुरा आणि वृंदावनमध्ये या उत्सवाची भव्यता आणि दिव्यता पाहण्यासारखी आहे. आज 26 ऑगस्ट 2024 श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. कृष्णाच्या जयंतीनिमित्त देशभरातील सर्व श्रीकृष्ण मंदिरांमध्ये विशेष पूजा-विधीचे आयोजन करण्यात आले आहे. व्रात्य बाल गोपाल म्हणजेच कान्हाच्या जयंती दिवशी भक्त उपवास करतात आणि त्यांची विशेष पूजा करतात.  दरम्यान या शुभ प्रसंगी महिला हातावर सुंदर मेहेंदी लावता, शृंगार करतात. प्रत्येक शुभ प्रसंगी मेहेंदीचे खूप महत्व असते. त्यामुळे हिंदू धर्मात महिला प्रत्येक शुभ प्रसंगी मेहेंदी लावतात. तुम्हीपण जन्माष्टमीनिमित्त सुंदर मेहेंदी डिझाईन पाहात असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही हटके मेहेंदी डिझाईनचे व्हिडीओ घेऊन आलो आहोत, व्हिडीओ पाहून तुमची तुमच्या हातावर सुंदर मेहेंदी डिझाईन काढू शकता. चला तर मग पाहूया हटके मेहेंदी डिझाईन... हे देखील वाचा: Celebrations of Sri Krishna Janmashtami 2024 ISKCON Juhu: मुंबई मधील इस्कॉन जुहू मध्ये जन्माष्टमीचा सोहळा कुठे, कधी पाहू शकाल?

कृष्ण जन्माष्टमीला काढता येतील असे हटके मेहेंदी डिझाईन 

 

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाच्या बाल-गोपाल रूपाला पंचामृताने अभिषेक करून भव्यपणे सजवले जाते. त्यांना सजवल्यानंतर अष्टगंध चंदन, अक्षत आणि रोळी यांचे तिलक लावले जाते. श्रृंगार पूर्ण झाल्यावर बालगोपालांना पाळण्यात टाकले जाते. पूजेदरम्यान त्यांना लोणी, साखर मिठाई, आणि मिठाईचे नैवेद्य चढवले जाते, त्यानंतर रात्री 12 वाजल्यानंतर, विशेष पूजा आणि आरती आणि भजन कीर्तन केले जाते.