
Happy Women's Day Marathi Wishes: महिलांच्या अस्तित्त्वाला सलाम करण्यासाठी दरवर्षी 8 मार्चला एका अनोख्या थीमवर इंटरनॅशनल वूमन्स डे (International Women's Day) हा दिवस साजरा केला जातो.या दिवसाच्या निमित्ताने जगभरातील प्रत्येक स्त्रीच्या अस्तित्त्वाला सन्मान करण्याचा दिवस. स्त्री शक्तीचा, कार्याचा, शौर्याचा सन्मान करण्याचा हा दिवस. आई, आजी, बहिण, मैत्रिण, बायको, मुलगी अशा विविध रुपात प्रत्येकाच्या आयुष्यात स्त्री येते. असंख्य लहान मोठ्या गोष्टीतून, कार्यातून ती स्वत:सोबतच आपल्या कुटुंबाचेही आयुष्य घडवत असते. या महिलांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे 8 मार्च, जागतिक महिला दिन. खरंतर महिलांप्रती आदरभाव हा वर्षाचे 365 दिवस मनात असायला हवा. सध्याच्या काळात महिलांवरील होणारे अत्याचार पाहता स्वातंत्र्यासोबतच महिलांना सुरक्षित वातावरणाची गरज आहे याची जाणीव पदोपदी होते. जागतिक महिला दिनानिमित्त आपण आपल्या आयुष्यातील महिलांना काही खास गिफ्ट्स देऊन आनंदीत करु शकतो. अगदी ते जरी शक्य नसेल तरी शुभेच्छा देऊन तुम्ही तुमच्या मनात असलेल्या आदराची त्यांना जाणीव करुन देऊ शकता. तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान वाढवणारे काही शुभेच्छा संदेश, SMS, Wishes. हे तुम्ही फेसबूक, व्हॉटसअॅप आणि मेसेजेसच्या माध्यमातून शेअर करुन त्यांचा दिवस स्पेशल करु शकता. (International Women's Day 2020: यंदाचा आंतररष्ट्रीय महिला दिन जाणून घ्या कोणत्या थीम वर जगभर साजरा केला जाणार).
जागतिक महिला दिन 2020 च्या शुभेच्छा:
स्मरण त्यागाचे, स्मरण शौर्याचे
स्मरण ध्यासाचे, स्मरण स्त्री पर्वाचे!
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ती आई आहे, ती ताई आहे
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे
ती मुलगी आहे, ती जन्म आहे
ती माया आहे,
तीच सुरुवात आहे आणि
सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे..
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

जबाबदारीसह घेते भरारी
न थके,
ना तक्रार करी
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

तुझ्या उत्तुंग भरारी पुढे
गगन ही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे वसावे
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

नानाविध भूमिकांमधून आयुष्याच्या
प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर
सोबत करणाऱ्या 'ती' ला
जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Women's Day 2020 GIFs
महिलांनी सर्वच स्तरात स्वतःला सिद्ध केलं आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, कला अशा विविध क्षेत्रातील महिलांची कामगिरी उत्तुंग आहे. तसंच नोकरदार महिला देखील घर, संसार, नोकरी, कुटुंब ही तारेवरची कसरत लिलया जमवतात. तर गृहीणी असणाऱ्या स्त्रिया कुटुंबासाठी स्वतःला झोकून देतात. पण या सगळ्यात महिलांनी स्वतःच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे दुर्लक्ष करु नये. आपल्या आरोग्याकडे, इच्छांकडे, मतांकडे पुरेसे लक्ष देऊन आपले स्वास्थ्य आणि स्वाभिमान जपण्याचा संकल्प या जागतिक महिला दिनानिमित्त आपण सगळ्यांनी करुया.