जगभरात आज पुरुष दिन (International Men’s Day 2021) साजरा केला जातो आहे. प्रत्येक वर्षी 19 नोव्हेंबर जागतिक पुरुष दिन (International Men’s Day) म्हणून साजरा केला जातो. जगभरात जरी 19 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय परुष दिन म्हणून साजरा केला जात असला तरी, भारतात हा दिन साजरा व्हायला मात्र 2007 साल उजडावं लागलं. पुरुष हक्कांसाठी देश पातळीवर लढणारी संस्था ‘सेव इंडियन फैमिली' (Save Indian Family Foundation) ने पहिल्यांदा भारतात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त Messages, Wishes, WhatsApp Status, Facebook Post, Images शेअर करुन आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी या इमेज इथून मोफत डाऊनलोड करता येऊ शकतील.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचेही महिला दिनाप्रमाणेच खास वैशिष्ट्य असते. हा दिवस प्रामुख्याने पुरुषांप्रती होणाऱ्या भेदभाव, शोषण आणि अन्याय, अत्याचार हिंसा, असमानतेबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा होतो. पुरुषांना त्यांचे हक्क अधिकार यांबाबत माहिती व्हावी यासाठा हा दिवस साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी या दिनानिमित्त एक खास थीमही ठेवली जाते.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन प्रत्येक वर्षी 19 सप्टेंबरला साजरा केला जातो. याची सुरुवात 7 फेब्रुवारी 1992 रोजी थॉमस ओस्टर द्वारा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमत्त एक वर्ष आगोदर म्हणजे 8 फेब्रुवारी 1991 मध्ये विचार व्यक्त केला. त्यानंतर 1999 मध्ये याबाबत त्रिनिनाद आणि टोबॅगोने ही संकल्पना वास्तवात आणली.
भारतात पहिल्यांदा 2007 मध्ये जागतिक पुरुष दिन साजरा करण्यात आला. भारतात 8 मार्च 1923 पासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. त्यानंततर भविष्यात कधी पुरुष दिनाची आवश्यकता भासेल असे कोणाला वाटलेही नसेल. परंतू, तो दिवस उजाडला. लैंगिक समानतेला चालना देण्यासाठी हा दिवसही साजरा होऊ लागला.