
Indian Navy Day 2022: भारतीय नौदलाने केलेली कामगिरी म्हणून दरवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतात नौदल दिन साजरा केला जातो. १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन ट्रायडंट जिंकल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात आणि दरवर्षी नौदल दिन साजरा करण्यासाठी वेगळी थीम ठरवली जाते. नेव्ही डे, त्याचा इतिहास आणि त्याचे महत्त्व याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचा.
भारतीय नौदल दिनाचा इतिहास
1971 मध्ये, भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, 3 डिसेंबरच्या संध्याकाळी पाकिस्तानने भारतीय हवाई तळांवर आक्रमण केले. भारताने त्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, निर्घाट, वीर आणि निपत या 3 क्षेपणास्त्र नौका कराचीच्या दिशेने सोडले. ऑपरेशन ट्रायडेंट दरम्यान, भारतीय नौदलाने पीएनएस खैबरसह 4 पाकिस्तानी जहाजे बुडवली आणि शेकडो पाकिस्तानी नौदलाचे जवान मारले गेले. नौदल दिनाच्या दिवशी भारत-पाकिस्तान युद्धात मारले गेलेल्यांचे स्मरण केले जाते आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलांची नौदल शाखा आहे ज्याचे नेतृत्व भारताचे राष्ट्रपती कमांडर-इन-चीफ म्हणून करतात. मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते.
भारतीय नौदल दिनाचे महत्त्व
भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने केली होती. नंतर त्याला रॉयल इंडिया नेव्ही असे नाव देण्यात आले आणि स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये भारतीय नौदल म्हणून त्याची पुनर्रचना करण्यात आली. पाकिस्तानविरुद्धच्या विनाशकारी युद्धानंतर संपूर्ण देशाने भारतीय नौदलाच्या यशाचा जल्लोष साजरा केला. मुलांना आणि भारतातील नागरिकांना भारताचा विजय आणि महत्त्व याविषयी माहित असणे देखील महत्त्वाचे आहे. या दिवशी मॅरेथॉन, आंतरशालेय प्रश्नमंजुषा स्पर्धा, एअर डिस्प्ले आणि टॅटू समारंभ यासारखे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.