How To Make Saraswati On Slate :दसरा पूजनाला पाटीवर सोप्या पद्धतीने अशी काढावी सरस्वती, पाहा व्हिडीओ

How To Make Saraswati On Slate: यंदा दसरा 5 ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. शारदीय नवरात्रीची सांगता दसरा या सणाने होते. देशभरात विविध स्वरूपात दसरा साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते. दस-याच्या दिवशी पाटीवर सरस्वतीचे प्रतीकरूप चित्र काढतात. झेंडूची फुले, उदबत्ती ओवाळून त्याची पूजा केली जाते. अभ्यासाची पुस्तके आणि कामात लागणारे साहित्य याचेही पूजन दसऱ्याला केले जाते. दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून आपट्याची पाने देतात. या दिवशी सीमोल्लंघन व शमीपूजन आणि शस्त्रपूजा करतात. योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा होती. सरस्वती पूजनाच्या दिवशी पाटीवर सरस्वती काढणे अनेकांना जमत नाही.आज पाहुया सोप्या पद्धतीने सरस्वती कशी काढता येईल.

पाहा व्हिडीओ:  

१  या अंकाचा वापर करुन ही सोपी पद्धत तुम्ही वापरु शकता 

हाताने नीट रेषा जमत नसतील तर पट्टीचा वापर करुन अशा पद्धतीने सरस्वती काढा.

तुम्हाला रांगोळीने सरस्वती काढायची असेल तर ही पद्धत तुम्ही वापरु शकता

दसऱ्यासाठी सरस्वती काढण्याची पद्धत आहे. आणि व्हिडीओ च्या माध्यामतून नक्कीच तुम्हाला कसे काढायचे कळले असेल.  सरस्वती काढण्याची  प्रैक्टिस करा. आणि सुंदर अशी सरस्वती रेखाटा.