Masala Milk Recipe for Kojagiri Purnima: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यंदा घरच्या घरी बनवा दूधासाठी लागणारा मसाला, पाहा व्हिडिओ
Kojagiri Special Milk Masala (Photo Credits: YouTube)

How to Make Kojagiri Purnima Masala Milk: अश्विन पौर्णिमेच्या रात्रीला कोजागिरी पौर्णिमा (Kojagiri Purnima) असे म्हणतात. या दिवशी चंद्राचा नूर काही औरच असतो. या दिवशी चंद्राचा लखलखीत प्रकाश आणि शितल छाया री प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी असते. या दिवशी खास मसाला दूध (Masala Milk) बनवून रात्री दूधात हा पौर्णिमेच्या चंद्र पाहिला जातो. त्यानंतर सर्वांना प्रसाद म्हणून हे दूध प्यायला देते. असं म्हणताता या दिवशी पडलेला चंद्राचा प्रकाश आणि छाया शरीरासाठी फार चांगली असते. म्हणून अजून कित्येक लोक कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागवून हा आरोग्यदायी चंद्राच्या सावलीचा आनंद घेतात. यावेळी बनविण्यात येणारे मसाले दूध आणि चंद्राच्या छायेत ते गरमागरम दूध पिण्यात एक वेगळीच मजा आहे.

हे दूध कसे बनवायचे हे आपल्यापैकी अनेकांना माहित असेलच. मात्र या दुधात मिसळण्यात येणारा मसाला कसा बनवतात हे माहित आहे का? अनेकजण विकतचा मसाला आणतात. मात्र तुम्ही घरच्या घरी देखील अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हा दूध मसाला बनवू शकता. हेदेखील वाचा- Kojagiri Purnima 2020: यंदा 'कोजागरी पौर्णिमा' कधी आहे?; जाणून घ्या शरद पौर्णिमेचे व्रत, शुभमुहूर्त आणि महत्त्व

पाहा दूधाच्या मसाल्याची रेसिपी:

काय मग कशी वाटली रेसिपी? अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी झटपट हा दूध मसाला बनवू शकता. शिवाय तुम्हाला तुमच्या आवडीनुसार त्यात कमी जास्त ड्रायफ्रूट्स टाकता येतील आणि मग कोजागिरी पौर्णिमेला या मसाला दूधाचा रंग आणखीनेच चढेल. नाही का!