Holi 2021 Special Puran Poli Recipes: होळीनिमित्त जाणून घ्या न वाटता पुरण बनवण्याची सोप्पी पद्धत, बनवा खमंग आणि लुसलुशीत पुरणपोळ्या, पाहा व्हिडिओ
Puran Poli (Photo Credits: YouTube)

Holi Special Puranpoli Recipes: 'होळी रे होळी पुरणाची पोळी' असा घोष होळी आल्यावर ऐकायला मिळतो. ते खरंच आहे होळी हा सण पुरणाची पोळीशिवाय अधुरा आहे. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा (Puranpoli) नैवेद्य दाखवला जातो. काही जणांना गोड गोड पुरणपोळीसोबत काहीतरी झणझणीत रस्सा खायला मिळावा म्हणून 'कटाची आमटी' देखील बनवतात. पुरणपोळी म्हटलं की, पुरण बनवणे आणि सर्वात महत्त्वाचे वाटणे हे मोठे काम असते. पूर्वीच्या काळी अनेक स्त्रिया पाट्यावर हे पुरण वाटायचे. मात्र काळ बदलला आणि महिलांचे काम थोडे सोप जावे म्हणून पुरणयंत्र आले. ज्यामुळे पुरण वाटणे अगदी सोपे झाले. मात्र पुरण थंड झाले की, पुरणयंत्रावर ते वाटण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

अशा वेळी पुरण न वाटता काही सोपी पद्धत असावी असे अनेक स्त्रियांची इच्छा असते. तुमची ही इच्छा पुढील व्हिडिओज पाहिल्यानंतर पुर्ण होईल. ज्यात अगदी सोप्प्या पद्धतीने न वाटता झटपट पुरण बनवू शकता.हेदेखील वाचा- Happy Holi Messages in Marathi: होळी च्या शुभेच्छा Wishes, WhatsApp Status द्वारे देऊन या सणाच्या निमित्ताने वाईट विचारांचे करा दहन!

पुरण बनविण्याची सोप्पी पद्धत:

गॅसवर पुरण वाटण्यासोबत चाळणीवरही तुम्ही सोप्प्या पद्धतीने पुरण वाटू शकता.

पुरणपोळी खायला कोणाला आवडणार नाही अशी माणसं फार थोडीच असतील. महाराष्ट्राचा हा पारंपारिक पदार्थ देशविदेशापर्यंत पर्यंत जाऊन पोहोचलाय. हा महाराष्ट्रीयन पदार्थ अन्य धर्माच्या तसेच परदेशातील लोकांना देखील प्रचंड आवडतो. त्यामुळे यंदा होळीसाठी तुम्हाला पुरणपोळीचा झटपट बेत करायचा असेल तर या रेसिपीज तुमच्या नक्की कामी येतील.