Happy Women's Day 2023 Wishes: नारीशक्तीचा सन्मान करण्यासाठी 8 मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' साजरा केला जातो. जागतिक महिला दिन हा प्रथम न्युयॉर्क येथे 28 फेब्रुवारी 1909 रोजी साजरा करण्यात आला. परंतु 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सुचनांनुसार 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. र आंतरराष्ट्रीय महिला दिनाची पायाभरणी महिला कामगार चळवळीमुळे झाली. त्यानंतर 15000 हून अधिक महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर निदर्शने केली होती.महिलांचा सन्मान करण्यासाठी आता जगभरात दर वर्षी महिला दिन साजरा केला जातो. जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes, Greetings शेअर करुन तुम्ही आपल्या आई, बहिण आणि पत्नीला खास मराठी शुभेच्छा देऊ शकता
पाहा खास शुभेच्छा संदेश
दरम्यान, महिलांच्या चळवळीनंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पक्षाने प्रथम राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली. यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची कल्पना प्रथम क्लारा जेटकिन या महिलेने व्यक्त केली. दरम्यान, हा दिवस प्रत्येक महिलेसाठी खास असतो, तुमच्या जवळच्या प्रत्येक महिलेला हे खास संदेश पाठवून, त्यांचा आनंद द्विगुणीत करा.