Happy Women's Day 2021 Messages: जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes, Greetings शेअर करुन स्त्रियांप्रती व्यक्त करा अभिमान!
International Women's Day 2021 Messages (PC - File image)

Happy Women's Day 2021 Messages: दरवर्षी 8 मार्च रोजी 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांच्या चळवळीचे प्रतीक असून हा दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू महिलांच्या हक्कांना प्रोत्साहन देणे हा आहे. यावर्षी Women in leadership: an equal future in a COVID-19 world ही आंतरराष्ट्रीय महिला दिनची थीम आहे. यावर्षी कोविड-19 साथीच्या काळात जगभरातील आरोग्यसेवा कर्मचारी, महिला डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी आदींच्या रुपात मुली आणि स्त्रियांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी ही थीम ठेवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्वप्रथम 1996 मध्ये साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी मोठ्या उत्सहात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाची सुरुवात अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात 1908 मध्ये झाली. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार आंतरराष्ट्रीय महिला दिनाची पायाभरणी महिला कामगार चळवळीमुळे झाली. त्यानंतर 15000 हून अधिक महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर निदर्शने केली. आंदोलन करणार्‍या महिलांनी कामकाजाचे तास कमी करावे, पगारामध्ये वाढ करावी आणि मतदानाचा हक्कही द्यावा, अशी मागणी महिलांनी केली. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी आजचा दिवस खास आहे. जागतिक महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेश, Wishes, Quotes, Greetings शेअर करुन तुम्ही आपल्या आई, बहिण आणि पत्नीला खास मराठी शुभेच्छा देऊ शकता. (वाचा - International Women's Day 2021 Gift Ideas: 'जागतिक महिला दिना'निमित्त तुमच्या आयुष्यातील खास स्त्री ला द्या हे अनोखे गिफ्ट )

ती आहे म्हणून सारे विश्व आहे,

ती आहे म्हणून सारे घर आहे,

ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत,

आणि केवळ ती आहे,

म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे…

Happy Women’s Day!

International Women's Day 2021 Messages (PC - File image)

ती आई आहे, ती ताई आहे,

ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे,

ती मुलगी आहे, ती माया आहे,

तीच सुरुवात आहे आणि

सुरुवात नसेल तर

बाकी सारं व्यर्थ आहे…

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

International Women's Day 2021 Messages (PC - File image)

आज जागतिक महिला दिनानिमित्त

तमाम माझ्या बहिणींना, युवतींना, किशोरींना,

विविध पातळीवर यशाची

उंच झेप घेणाऱ्या महिला साथींना,

शेतामध्ये राबून सोनं पिकवणाऱ्या माझ्या

कष्ट करणाऱ्या बहिणींनाही आभाळभर शुभेच्छा…

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

International Women's Day 2021 Messages (PC - File image)

ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊंचा ‘शिवबा’ झाला..

ज्याला स्त्री ‘बहीण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानदेव’ झाला..

ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला..

आणि ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सीतेचा ‘राम’ झाला..

“प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिहाचा वाटा आहे…”

Happy Women’s Day!

International Women's Day 2021 Messages (PC - File image)

स्री म्हणजे वास्तव्य,

स्री म्हणजे मांगल्य,

स्री म्हणजे मातृत्व,

स्री म्हणजे कतृत्व

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

International Women's Day 2021 Messages (PC - File image)

दरम्यान, महिलांच्या चळवळीनंतर अमेरिकेच्या सोशलिस्ट पक्षाने प्रथम राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली. यानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची कल्पना प्रथम क्लारा जेटकिन या महिलेने व्यक्त केली. क्लाराच्या प्रस्तावाला सर्व महिलांनी एकमताने मान्यता दिली. त्यानंतर 1910 मध्ये जागतिक स्तरावर महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव क्लारा जेटकिन यांनी दिला. अशाप्रकारे 1911 मध्ये ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. परंतु, आंतरराष्ट्रीय महिला दिनाची औपचारिक मान्यता 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने दिली. तेव्हापासून तो जगभर साजरा केला जात आहे.