आज गुरु गोविंदसिंह जी चीं 354 वी जयंती आहे. नानकशाही कलेंडरनुसार, गुरु गोबिंदसिंह यांची जयंती 20 जानेवारी रोजी साजरी केली जाते. या दिवसाला प्रकाश उत्सव, प्रकाश पर्व, गुरु गोबिंदसिंहजी गुरपुरब या नावाने देखील ओळखले जाते. गुरु गोबिंदसिंह हे शिख धर्माचे 10 वे गुरु होते. यांचे खरे नाव गोबिंदराय असे असून त्यांचा जन्म 1666 मधील सप्तमी तिथीला झाला होता. जगभरातील शिख धर्मियांसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. या निमित्ताने अनेकजण सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून आपले नातेवाईक, प्रियजन, आप्तेष्ट यांना शुभेच्छा देतात. यासाठी फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), इंस्टाग्राम (Instagram) यांसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करण्यासाठी खास शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, SMS, GIF's, Quotes आणि Greetings.
जगातील शिख धर्मीय लोक त्यांच्या दहा वेगवेगळ्या गुरुंचे 10 गुरुपुरक वर्षभरात साजरे करतात. या दहा गुरुंनी शिख धर्मांचा प्रसार करण्यास आणि त्याचे महत्त्व प्रस्थापित करण्यासाठी मोठे कार्य केले. गुरु गोबिंद सिंह हे शेवटचे शिख गुरु होते. आधात्मिक गुरु, योद्धा, कवी आणि तत्त्वज्ञ अशी त्यांची ओळख होती. गुरु गोबिंदसिंह यांचे वडील गुरु तेजबहादूर यांची औरंगजेबाने हत्या केल्यानंतर वयाच्या अवघ्या 9 व्या वर्षी ते शिख धर्मांचे नेतृत्व करु लागले. शिख धर्मात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. गुरुग्रंथ साहेब हा धर्मग्रंथ म्हणून प्रस्थापित करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
गुरु गोबिंदसिंग जी प्रकाश पर्व 2021 शुभेच्छा!
गुरु पुरब दिवस साजरा करताना शिख धर्मीय लोक पहाटे एकत्र येऊन प्रभात फेरीत सहभाग घेतात आणि गुर्बाणी गातात. त्यासोबत शिख धर्माचे ज्ञानाची देवाण घेवाण करुन लंगरच्या जेवणाची तयारी करतात. हे प्रकाश पर्व साजरे करताना कडा प्रसाद हा बनवला जातो आणि त्या सोबत लंगरमध्ये विविध चविष्ट पदार्थांची मेजवानी असते.