Vaikuntha Ekadashi 2025 Messages In Marathi 6 (फोटो सौजन्य - File Image)

Vaikuntha Ekadashi 2025 Messages In Marathi: दरवर्षी पौष मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला वैकुंठ एकादशीचे (Vaikuntha Ekadashi 2025) व्रत केले जाते. वारकरी संप्रादयामध्ये या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या एकादशीला पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी (Putrada Ekadashi 2025) असेही म्हणतात. या एकादशीच्या निमित्ताने ज्योतिषशास्त्रात अतिशय शुभ मानल्या गेलेल्या विशेष योगांचा संयोग होत आहे. तसेच, हा दिवस शुक्रवार आहे, जो देवी लक्ष्मीला समर्पित आहे.

वैकुंठ एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूच्या कृपेने सर्व कार्यात यश मिळते असे मानले जाते. पंडित आणि ज्योतिषांच्या मते, 2025 मधील ही पहिली एकादशी असून ती शुक्रवारी 10 जानेवारीला येत आहे. हा दिवस भगवान विष्णूची पत्नी आणि संपत्तीची देवी देवी लक्ष्मीला समर्पित आहे. या दिवशी तुम्ही विष्णू भक्तांना Wishes, Greetings, WhatsApp Status द्वारा वैकुंठ एकादशीच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ग्रेटिंग्ज मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Vaikunta Ekadashi 2025: कधी आहे पुत्रदा एकादशी? जाणूण घ्या, तारीख, महत्व आणि शुभ मुहुर्त)

वैकुंठ एकादशीच्या मराठमोळ्या शुभेच्छा -

ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः

आम्ही प्रार्थना करतो की या परम पवित्र

वैकुंठ एकादशीच्या व्रताने तुम्हाला

अंतकाळी वैकुंठाची प्राप्ती होवो

आणि तुमच्या कुटुंबाला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळो.

वैकुंठ एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

Vaikuntha Ekadashi 2025 Messages In Marathi 1 (फोटो सौजन्य - File Image)

जय श्री लक्ष्मी नारायण नमः

वैकुंठ एकादशीच्या शुभ प्रसंगी,

तुमच्या पितरांना मोक्ष प्राप्त होवो.

वैकुंठ एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

Vaikuntha Ekadashi 2025 Messages In Marathi 2 (फोटो सौजन्य - File Image)

ॐ श्री लक्ष्मी नारायण नमः

वैकुंठ एकादशीच्या व्रताने तुमचे

जन्मोजन्मीचे पाप नष्ट होवो,

विष्णू लोकाची प्राप्ती होवो

आणि जन्म-मरणाच्या चक्रातून मुक्ती मिळो.

वैकुंठ एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

Vaikuntha Ekadashi 2025 Messages In Marathi 3 (फोटो सौजन्य - File Image)

ॐ नमो नारायण

वैकुंठ एकादशीच्या दिवशी उपवास आणि

भगवान विष्णूंची पूजा केल्याने

अनेक पापांचा नाश होऊन

वैकुंठाची प्राप्ती होते.

वैकुंठ एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

Vaikuntha Ekadashi 2025 Messages In Marathi 4(फोटो सौजन्य - File Image)

ॐ नमो नारायण नमः

भगवान विष्णू तुम्हाला सुख, शांती, समृद्धी,

यश आणि कीर्ती प्रदान करो.

वैकुंठ एकादशीच्या शुभेच्छा.

Vaikuntha Ekadashi 2025 Messages In Marathi 5 (फोटो सौजन्य - File Image)

वैकुंठ एकादशीचा दिवस शुभ -

वैकुंठ एकादशीचा दिवस शुभ असून ज्योतिष शास्त्रात या दिवसाला अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते. याशिवाय, हा दिवस कूर्म द्वादशी देखील आहे, जो भगवान विष्णूच्या दुसऱ्या अवताराचा जन्मदिवस देखील आहे.