महाराष्ट्रात सर्वत्रच गणेशोत्सवाची धूम असते. आजपासून यंदाच्या गणेशोत्सवाला (Ganeshotsav) सुरूवात झाली आहे. घरात, सार्वजनिक मंडळांमध्ये जसे गणपती विराजमान करण्यासाठी सार्यांची तयारी सुरू असते तशीच धावपळ अनेक ट्रेन मध्येही असते. धावत्या गोदावरी एक्स्प्रेसमध्येही (Godavari Express) मागील 27 वर्ष बाप्पा विराजमान होत होता मात्र यंदा ही परंपरा खंडित झाली आहे. धावत्या रेल्वेत गणेश मूर्ती स्थापना करण्यास रेल्वे प्रशासनाने विरोध केला आहे. रेल्वेच्या या निर्णयावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मनमाड -मुंबई या गोदावरी एक्स्प्रेसमध्ये 'गोदावरीचा राजा' विराजमान होत होता. पासबोगी मध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाची मूर्ती स्थापना करून दहा दिवस त्याची नित्यनियमाने त्याची पूजा केली जात होती मात्र आता त्याला रोखण्यात आलं आहे. नक्की वाचा: Ganpati Festival Special Train On Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी गावी जाणार्यांसाठी CSMT-Kudal अनारक्षित विशेष गाडी धावणार .
कोविड च्या काळात गोदावरी एक्सप्रेस बंद करण्यात आली. ही परंपरा खंडीत होऊ नये म्हणून नंतर समर एक्सप्रेस मध्ये हा गणपती विराजमान करण्यात आला. सणाला सुट्टी नसलेले अनेकजण रेल्वेने प्रवास करत असताना त्यांच्या पासधारकांच्या बोगी मध्ये बाप्पाला विराजमान करण्याची पद्धत सुरू झाली होती पण आता त्या सेलिब्रेशनला पूर्णविराम मिळाला आहे. मनमाड मधून सुटणारी गाडी नंतर धुळ्यातून सुरू झाली आणि हा धावत्या ट्रेन मधील बाप्पाचा उत्सव आता बंद झाला आहे. दरम्यान रेल्वे प्रवासी संघटनांनी देखील ही ट्रेन पुन्हा सुरू व्हावी यासाठी मागणी केली होती पण त्यांच्या प्रयत्नांनाही यश आलं नाही.