Rangoli Designs for Republic Day 2025: 26 जानेवारी 2025 रोजी भारत आपला 76 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2025) साजरा करणार आहे. देशभरात मोठ्या उत्साहाने आणि देशभक्तीने प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सर्वत्र तिरंगी आणि उत्साहाचे वातावरण असते. या दिवशी घरे आणि सार्वजनिक ठिकाणी तिरंग्याच्या रंगाप्रमाणे रांगोळ्या (Republic Day Rangoli Designs) काढल्या जातात, ज्यामुळे हा दिवस आणखी खास बनतो.
तुम्ही देखील यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त तुमच्या घरासमोर, अंगणात किंवा तिरंग्याच्या समोर, शाळेच्या प्रांगणात रांगोळी काढण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही खास प्रजासत्ताक दिन रांगोळी डिझाईन्स (Republic Day 2025 Rangoli Designs) घेऊन आलो आहोत. तुम्ही या सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाईन्स काढून प्रजासत्ताक दिनाचा राष्ट्रीय सण आणखी खास पद्धतीने साजरा करू शकता.
प्रजासत्ताक दिन रांगोळी डिझाईन्स व्हिडिओ -
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सार्वजनिक ठिकाणी तसेच शाळा आणि कॉलेजमध्ये ध्वजारोहन केलं जातं. तसेच या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आणि भाषणांचे आयोजन केले जाते. याशिवाय, अनेक शाळांमध्ये या दिवशी सकाळी प्रभात फेरी काढली जाते. यावेळी विद्यार्थी राष्ट्रभक्तीपर गीतं गातात.