
Dhanteras 2021 Marathi Wishes: दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस. या दिवसाच्या नावात धन हा शब्द असल्याने अनेकजण याचा संबंध धनाशी जोडतात. मात्र येथे हा अर्थ अपेक्षित नाही. तर समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून निघालेल्या धन्वंतरी या अवताराचा हा उत्सव आहे. धन्वंतरी म्हणजे आरोग्याची देवता. यंदा धनत्रयोदशी मंगळवार, 2 नोव्हेंबर रोजी आहे. या सणानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Wishes, Messages, Images सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), व्हॉट्सअॅप (WhatsApp), ट्विटर (Twitter, इंस्टाग्राम (Instagram) वर शेअर करुन तुम्ही तुमच्या नातेवाईकांना शुभेच्छा देऊ शकता. (Diwali 2021 Calendar With Dates in India: यंदा दिवाळीत धनतेरस, लक्ष्मी पूजन ते भाऊबीज कधी? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक)
आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी दिवशी भगवान धन्वंतरी समुद्र मंथनादरम्यान हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले. वैद्यकीय विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अवतार घेतल्याचे मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा देखील केली जाते. यामुळे पैशाची आणि धान्याची कमतरता भासत नाही, अशी मान्यता आहे. तसंच काही लोक या दिवशी सोने-चांदीची भांडी, नाणी, एखादी नवी वस्तू खरेदी करतात.
धनतेरस शुभेच्छा!
दिव्यांची रोषणाई
फराळाचा गोडवा
अनोखी अपूर्वाई
अन् धनत्रयोदशीचा सोहळा!
सर्वांना धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा!

आला आला दिवाळीचा सण
घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!

धन्वंतरीची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव राहो
निरोगी, आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची, समृद्धीची
आणि भरभराटीची जावो
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
धनतेरस च्या हार्दिक शुभेच्छा!

धनत्रयोदशी दिवशी पहिला दिवा लागतो दारी
कंदिल, पणत्यांनी उजळून जाते दुनिया सारी
फराळ, फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरी करू आली आली रे दिवाळी
धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

मागील दोन वर्ष कोविड-19 संकटाच्या सावटामुळे दिवाळी अगदी साध्या पद्धतीने साजरी करावी लागली. मात्र यंदा कोरोनाचे संकट कायम असले तरी रुग्णसंख्येतील घट आणि लसीकरण यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. यामुळे निर्बंधात काही प्रमाणात मुभा देण्यात आली आहे. मात्र नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्हीही नियमांचे पालन करत यंदाची दिवाळी आनंदाने साजरी करा.