अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस(Christmas ) सण आला आहे. बऱ्याच घरात आता ख्रिसमस ची लगबग पहायला मिळत असेल.लाइटिंग्स,फुलांची सजावट , ख्रिसमस ट्री तयारीत सगळे लागले असतील. क्रिसमस (Christmas) सण हा ख्रिस्ती बांधवांसाठी वर्षातील फार महत्त्वाचा सण मानला जातो. या सणासाठी अनेक महिन्यांपासून त्यांची तयारी सुरु असते. या सणात सांताक्लॉज (Santa Claus) प्रमाणे आणखी एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे 'क्रिसमस ट्री' (Christmas Tree). ही क्रिसमस ट्री सजविण्यासाठी लहान मुलांपासून थोरा-मोठ्यांपर्यंत विशेष उत्साह दिसतो. हे झाल सजावतीच.पण या ख्रिसमस मध्ये खवयांची ही मजा असते कारण या दिवसात वेगवेगळ्या प्रकारच्या कूकीज, वाइन केक, बिस्किट्स हे सगळ काही मिळत.
परंतू यंदा सगळीकडेच कोरोनाचे सावट आहे.अशा दिवसात तुम्हाला घरच्या घरी केक( Home Made Cake) बनवायची इच्छा असेल मात्र समजत नसेल कसा बनवायचा तर आजचा हा लेख खास तुमच्यासाठीच आहे.आज आपण असे काही व्हिडिओ पाहणार आहोत जे बघून तुम्ही सोप्या पद्धतीने अगदी घरच्या घरी मस्त केक बनवू शकाल.चला तर मग पाहूयात होम मेड केक रेसिपी व्हिडिओ.
होममेड वाइन केक ( Wine Cake)
एगलेस चॅाकलेट स्पॅान्ज केक(Chocolate Sponge Cake)
ओवनशिवाय बनवलेला चॅाकलेट/टी केक (Chocolate Tea Cake)
ख्रिसमस स्पेशल प्लम केक (Christmas Special Plum Cake)
हे व्हिडिओ पाहुन तुम्हाला पण खात्री झाली असेल ना की तुम्ही ही असेच मस्त केक घरी बनवू शकता याची.तेव्हा मग आता कसलाच विचार न करता लागा कामाला आणि यंदाच्या ख्रिसमस ला घरच्या घरी छान केक बनवा आणि घरच्यांना आणि मित्रपरिवाला खाऊ घाला.