
मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी शहाजी भोसले अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 50 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. इतिहासातील नोंदीनुसार, 3 एप्रिल 1680 साली शिवरायांचा मृत्यू झाला. त्यामुळे शिवप्रेमी दरवर्षी 3 एप्रिलला आपल्या रयतेच्या राजाच्या स्मृतिनिमित्त आपल्या भावना व्यक्त करत त्यांना कार्याला सलाम करतात. आदिलशाही विरूद्ध न झुकता मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य स्थापन करणार्या या आदर्श व्यक्तिमत्त्वाचा वसा पुढल्या पिढीपर्यंत नेण्यासाठी तुम्ही शिवरायांचे फोटो, Quotes शेअर करू शकता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनी तुम्ही आज WhatsApp Status, Facebook Messages शेअर करू शकता.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली आई जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. मूठभर मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि बघता बघता मुघलांप्रमाणेच आदिलशाहीचाही महाराष्ट्रात शेवट केला.
शिवरायांना अभिवादन
विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध, मुघल साम्राज्याविरुद्ध शिवराय शिताफीने लढले. गनिमी काव्याने शत्रूंशी सामना करत मूठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी परकीय आक्रमणं परतून लावली. त्यांनी हिंदुस्थानामध्ये मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली. अशा या पराक्रमी राजाला अभिवादन करून त्यांच्या स्मृतींचं आज स्मरण करायला विसरू नका.