Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 Messages (Photo Credits: File)

Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary: छत्रपती शिवाजी महाराजांचे नुसते नाव जरी घेतले तरी 'असा राजा पुन्हा होणे नाही' हेच एकच वाक्य डोळ्यासमोर येते. आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी वेचणा-या या जाणत्या राजाने रायगडावर 3 एप्रिल 1680 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या 341 स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस वंदन करुन त्यांना सोशल मिडियाद्वारे अनोखी मानवंदना देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला संदेशाची गरज लागेल. त्यांच्या पुण्यतिथीच्या स्मरण करून त्यांच्या पराक्रमाच्या गाथा पुढच्या पिढीला देणंदेखील गरजेचे आहे.

यासाठी फेसबूक (Facebook), व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) मेसेज, स्टेटसच्या माध्यममातून त छत्रपतींच्या स्मृतींना अभिवादन करणारे हे खास मराठमोळे मेसेज, इमेजेस (Images) नक्की शेअर करा.

रयतेसाठी झटला तो,

स्वराज्यासाठी लढला तो,

तमाम मराठ्यांसाठी

तळपती आग होता तो

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 Messages (Photo Credits: File)

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधी श्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!

शिवछत्रपतींच्या पुण्यतिथीस शिवरायांस मानाचा मुजरा!

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 Messages (Photo Credits: File)

पराक्रमी योद्धा,

कुशल रणनीतिकार,

वीर महानायक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांस शत शत प्रणाम!

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 Messages (Photo Credits: File)

एक विचार समानतेचा

एक विचार नीतीचा

ना धर्माचा ना जातीचा

राजा माझा फक्त मातीचा

शिवछत्रपतींच्या पुण्यतिथी निमित्त त्यांस मानाचा मुजरा!

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 Messages (Photo Credits: File)

भगव्याची ज्यांनी राखली शान

मुघलांपुढे कधीही न झुकविली त्यांनी मान

ज्यांच्या शौर्यापुढे आपण आहोत सूक्ष्म जीवासमान

अशा शिवछत्रपतींच्या पुण्यतिथी दिनी करुया त्यांस कोटी कोटी प्रणाम!

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2021 Messages (Photo Credits: File)

स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये शिवाजी महाराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात.