Chhatrapati Shivaji Maharaj Powada: छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्य गाथा सांगणाऱ्या पोवाड्यांची यादी, पाहा
छत्रपती शिवाजी महाराज

Chhatrapati Shivaji Maharaj Powada: श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये एका मराठा कुटुंबात झाला काही लोक त्यांच्या जन्माचे वर्ष 1627 सांगतात. त्यांचे पूर्ण नाव शिवाजी राजे भोसले असे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाई ह्याचे पुत्र होते. त्यांचा जन्म पुण्याच्या नजीक शिवनेरी गड येथे झाला होता. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. राष्ट्राला परकीय आणि आक्रमक सत्तेपासून मुक्त करून संपूर्ण भारतात सार्वभौमिक स्वतंत्र राज्य बनविण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले होते.  दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अनेक ठिकाणी पोवाडे म्हंटले जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांची संपूर्ण गाथा या पोवाड्याच्या माध्यमातून सांगितली जाते, दरम्यान, आम्ही नावाजलेल्या पोवाड्यांची यादी घेऊन आलो आहोत, चला तर पाहूया

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे, पाहा 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित पोवाड्यातून महाराजांचे पराक्रम आपल्या डोळ्यासमोर हुबेहुब उभे राहतात. हे पोवाडे ऐकल्यावर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.