Chhatrapati Sambhaji Maharaj Tithi Nusar Jayanti 2023 Wishes: छत्रपती संभाजी महाराज तिथीनुसार जयंती निमित्त शुभेच्छा! डिजिटल युगात शेअर करा SMS, Whatsapp Status, Wallpaper & Images

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी स्थापन केलेल्या मराठी साम्राज्याचे दुसरे शासक (Second Ruler of Maratha Kingdom) छत्रपती संभाजी महाराज यांची तारखेनुसार साजरी होणारी जयंती (Sambhaji Maharaj Birth Anniversary) 14 मे या दिवशी असते. मात्र, त्यांच्या तारखेवरुन वाद असल्याने आणि पंचांग मानणारे काही लोक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तिथीनुसारही (Chhatrapati Sambhaji Maharaj Tithi Nusar Jayanti 2023) साजरी करतात. त्यामुळे महाराजांची जयंती (Tithi Nusar Jayanti 2023) एकाच वर्षी दोन वेळा साजरी होते. त्यामुळे महाराजांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देण्याची दोन वेळा संधी नागरिकांना मिळते. त्यामुळे संभाजी महाराज जयंतीनिमित्त तुम्ही मराठी SMS, Messages, Whatsapp Status द्वारे खास शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्ही खालील ईमेज डाऊनलोड करू शकता.

शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी भोसले हे त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर मराठा राज्याचे दुसरे शासक बनले. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या पोटी संभाजीराजे भोसले यांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला. मात्र, पुढच्या अवघ्या दोन वर्षांमध्ये संभाजीराजे यांच्यावरी आईचे छत्र हरपले. आई सईबाई यांचे निधन झाले. पण, त्याने त्यांच्या आयुष्यात विशेष फरक पडला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य, चिकित्सपणा आणि राज्यकारभाराचे सर्व गुण त्यांनी आत्मसात केले. ते अखेरपर्यंत लढवय्ये राहिले.

मराठी मुलुखातले आणि स्वराज्याला मानणारे सर्व लोक दरवर्षी तारखेनुसार (14 मे) आणि तिथीनुसार महाराजांच्या आठवणीत त्यांची जयंती साजरी करतात. या दिवशी विविध कर्यक्रमांचे आयोजन केले जाते. छत्रपतींच्या शौर्याचे पोवाडे गायले जातात. गड-किल्ल्यांवर उत्सवांचे आयोजन होते. इतिहासाच्या पानापानांतून महाराजांच्या शौर्याचे धडे घेतले जातात.