
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2024 Wishes In Marathi: हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची तारखेनुसार आज जयंती (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2024). छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव संभाजी महाराज यांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर 14 मे 1657 साली झाला. संभाजी राजे 2 वर्षांचे असताना सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर माता जिजाऊं साहेबांनी संभाजी महाराजांच्या पालनपोषणाकडे लक्ष दिले.
संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी असा संभाजी महाराजांचा लौकिक आहे. यासह समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपले वर्चस्व गाजवले.
6 जून 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला, तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराज यांनी राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. पुढे शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर 16 जानेवारी 1681 रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजींचा भव्य राज्याभिषेक झाला. संभाजी महाराजांना आपल्या 9 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये मोगल, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी यांच्याबरोबर एकाकी लढा दयावा लागला. मात्र त्यांनी केलेल्या प्रत्येक लढाईमध्ये त्यांचे धैर्य, शौर्य आणि धडाडी दिसून येते.
अशा या थोर राजाच्या जयंतीनिमित्त खास Messages, Wallpapers, Images, Wishes शेअर करून करा मानाचा मुजरा






दरम्यान, अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता. संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. बुधभूषण या गंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविदया यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. यात राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे.