
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2023 wishes: छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म तिथीनुसार ज्येष्ठ शु. द्वादशीला झाला होता. संभाजी महाराज यांची जयंती 14 मे रोजी सर्वत्र साजरी केली जाते. संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील अन्य भागात छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीचा मोठा उत्साह पहायला मिळतो. शिवाजीपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी महाराजांचे जीवनही वडील छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच देश आणि हिंदुत्वासाठी समर्पित होते. प्रत्येक वर्षी 14 मे रोजी संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठा शासनकाळातील त्यांचे योगदान श्रद्धांजलीच्या रुपात साजरी केली जाते. संभाजी यांना सिंहासनावर बसण्यापर्यंतचा प्रवास अतिशय खडतर होता. त्यांनी 9 वर्ष शासन केले. संभाजी महाराज मराठा धर्माचे रक्षक होते. आपल्या निडरतेसाठी ओळखले जायचे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त WhatsApp Status, Wishes, Facebook Wallpaper, Images शेअर करत द्या मराठमोळ्या शुभेच्छा!
पाहा, खास शुभेच्छा संदेश






महाराष्ट्रासह देशातील अन्य भागात छत्रपती संभाजी महाराजांची जयंतीचा मोठा उत्साह पहायला मिळतो. शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र संभाजी भोसले यांनी आपल्या वडिलांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचा कार्यभार स्वीकारला आणि मराठा साम्राज्याचे दुसरे शासक बनले आणि उत्तम पद्धतीने राज्य केले.