Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2021 HD Images: छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त अनुयायांना SMS, Messages, Images, Facebook, WhatsApp आदी माध्यमातून द्या शुभेच्छा
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | (Photo Credits: File Image)

छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र आणि सईबाई यांचे थोरले चिरंजीव मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांची आज जयंती. 14 मे या दिवशी छत्रपती संभाजीराजे यांची जयंती (Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2021) तारखेनुसार साजरी केली जाते. किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा जन्म 14 मे इ. स. 1657 या दिवशी झाला. संभाजी महाराज लहान असतानाच त्यांचे मातृछत्र हरपले. महाराणी सईबाई यांचे निधन झाले. सईबाई यांच्या पश्चात धाराऊ पाटील गाडे ही कुणबी महिला संभाजी महाराज यांची दूध आई बनली. धाराऊ पाटील या पुणे नजीक असलेल्या कापूरहोळ गावच्या होत्या. संभाजी महाराज यांचा सांभाळ आजी राजमाता जिजाबाई यांनी केला. संभाजी महाराज यांच्यावर त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांनीही खूप माया केली. असे असले तरी त्यांच्या सावत्र आई सोयराबाई यांच्याशी मात्र त्यांचे कधी जमले नाही. सोयराबाई या संभाजी महाराज यांच्यावर नेहमी राग मानून असत. अनेकदा सोयराबाई या महाराजांच्या राजकीय कारकिर्दीतही ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करत होत्या असा दाखला इतिहासात मिळतो. छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त अनुयायांना शुभेच्छा देण्यासाठी SMS, Messages, Images, Facebook, WhatsApp इथे देत आहोत. ज्या आपण डाऊनलोड करु शकता.

इतिसातील दाखल्या प्रमाणे छत्रपती संभाजीराजे हे अत्यंत उमदे आणि देखणे होते. त्यांच्या शौर्याचे अनेक दाखले इतिहासात मिळतात. शौर्यासोबतच संभाजी राजे हे विविध भाषांमध्ये पारंगत आणि अत्यंत मुत्सद्दी होते. राजकारणातील अत्यंत ठळक आणि बारकावे त्यांनी मोठ्या कष्टाने आत्मसात केले होते.

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | (Photo Credits: File Image)
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | (Photo Credits: File Image)
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | (Photo Credits: File Image)
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | (Photo Credits: File Image)
Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti | (Photo Credits: File Image)

छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या लोकांनी संगमेश्वर येथे पकडले. त्यांच्या मावळ्यांनी त्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले. परंतू, त्यात त्यांना यश आले नाही. संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार कवी कलश यांना औरंजेबापुढे बहादुरगड, (आताचा धर्मवीरगड) येथ आणण्यात आले. तेथे औरंगजेबाने प्रस्ताव ठेवला की, सर्व गड, किल्ले जर आपल्याला दिले तर आपल्याला जीवदान देऊ. परंतू, संभाजी मराराजांन औरंगजेबाचा प्रस्ताव धुडकावून लावला. पुढे संभाजी महाराज आणि त्यांचा सल्लागार कवी कलश यांना अत्यंत क्रुरपणे हाल हाल करुन ठार मारण्यात आले.