Buddha Purnima 2022 Messages: वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला होता, म्हणून या तिथीला बुद्ध पौर्णिमा म्हणतात. बुद्ध पौर्णिमा 15 मे रोजी दुपारी 12:45 पासून सुरू होत आहे, जी 16 मे रोजी सकाळी 09:43 पर्यंत राहील. यावर्षी बुद्ध पौर्णिमा 16 मे रोजी आहे. बौद्ध समाजासाठी बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी ते भगवान बुद्धाची पूजा करतात. तसेच त्यांच्या शिकवणी आणि संदेश त्यांच्या जीवनात लागू करण्याचा प्रयत्न करतात.
बुद्ध पौर्णिमा तिथी देखील विशेष आहे. कारण याच तिथीला भगवान बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले होते. भगवान बुद्धांचे महापरिनिर्वाण उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे बुद्ध पौर्णिमेला झाले. वैशाख पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा हा असा दिवस आहे, ज्या दिवशी भगवान बुद्धांचा जन्म झाला, त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. बुद्ध पौर्णिमेनिमित्त Wishes, Greetings, Images च्या माध्यमातून आपल्या प्रियजणांना खास मराठी शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज नक्की उपयोगात येतील. या ईमेज तुम्ही डाऊनलोड करू शकता आणि याद्वारे आपल्या मित्र-मैत्रिणींना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊ शकता. (हेही वाचा - Buddha Purnima 2022 Wishes: बुद्ध पोर्णिमेनिमीत्त Images, Quotes, Messages, प्रियजनांना पाठवून द्या बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा)
बुद्ध पौर्णिमा निमित्त
आपणास व आपल्या
परिवारास हार्दिक शुभेच्छा!
एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना
प्रकाश देऊ शकते तसेच
बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य
उज्वल करु शकतो
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा
ज्यांनी दिला शांततेचा उपदेश
महाल सुख सोडूनी घातला
भिक्षुकाचा वेश
नाकारले राजपुत्र असून युद्ध
असे होते तथागत गौतम बुद्ध
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा
क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचारने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते..
बुद्ध पौर्णिमा निमित्त,
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
बुद्धं शरणं गच्छामि,
धम्मं शरणं गच्छामि,
संघं शरणं गच्छामि
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही.
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही.
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही.
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही.
बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
भगवान बुद्धांना श्री हरी विष्णूचा 9वा अवतार मानले जाते. म्हणून बुद्ध पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा केली जाते. भगवान बुद्धांनी वयाच्या 29 व्या वर्षी संन्यास घेतला होता आणि 6 वर्षे कठोर आध्यात्मिक साधना करून त्यांना ज्ञान प्राप्त झाले होते. भगवान बुद्धांनी लोकांना सत्य, अहिंसा, धर्म, दया आणि परोपकारासाठी प्रेरित केले आणि बौद्ध धर्माची स्थापना केली.