शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे (Bal Thackeray) यांचं 17 नोव्हेंबर 2012 दिवशी मुंबई मध्ये निधन झाले. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी त्यांनी कायमच आपला आवाज बुलंद ठेवला. अनेक शिवसैनिकांसाठी ते आधार होते. अनेकांच्या मनात ते गुरूस्थानी आहे. त्यांना गुरू मानू अनेकांची राजकीय वाटचाल सुरू झाली आहे. आज बाळ ठाकरेंच्या 11 व्या पुण्यतिथीच्या(Bal Thackeray Punyatithi) दिवशी त्यांनीच महाराष्ट्राला दिलेल्या काही Quotes, Thoughts चं स्मरण करत हा दिवस त्यांच्या आठवणींना उजाळा देत घालवण्यासाठी बाळ ठाकरेंची ही काही प्रसिद्ध कोट्स तुम्हांला आज आत्मविश्वास देतील.
बाळ ठाकरे यांना घरातूनच समाजसेवेचा वारसा मिळाला होता. व्यासंगी बाळ ठाकरे राजकारणी, शिवसेना प्रमुख म्हणून अनेकांना ठाऊक असले तरीही या कणखर नेत्यासोबतच ते कलाप्रेमी, निसर्गप्रेमी, प्राणीप्रेमी देखील होते. राजकारणासोबतच त्यांनी अनेक आवडीनिवडी जपल्या होत्या. राजकारणात 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा शिवसैनिकांना मूलमंत्र देणार्या बाळ ठाकरेंचे अन्य काही विचार देखील तुम्हांला आज सकारात्मक उर्जा देतील. पहा खास ठाकरे शैलीतील त्यांची गाजलेली काही भाषणे (Watch).
बाळ ठाकरे यांचे विचार
बाळ ठाकरे यांच्या पश्चात शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. नंतर पक्षात फूट पडली आणि आता निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंची शिवसेना हा मूळ पक्ष असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता त्यांच्या पश्चात दोन वेगळ्या मार्गांनी शिवसेना आपला प्रवास करत आहे.