Bal Gopal Dresses for Janmashtami 2024: कृष्ण जन्माष्टमी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी 27 ऑगस्ट 2024 रोजी साजरी होत आहे. असे मानले जाते की, या शुभ तिथीला रोहिणी नक्षत्रात रात्री 12 वाजता माता देवकीच्या गर्भातून भगवान विष्णूने श्रीकृष्णाच्या रूपात आठवा अवतार घेतला होता. भगवान श्रीकृष्णाच्या बालपणातला खोडकर स्वभाव सर्वांना माहित आहे. त्याच्या खोडकर, खेळकर आणि आनंदी स्वभावामुळे त्याला बाल गोपाळ किंवा नंद गोपाळ म्हणतात. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे कान्हाची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. दरम्यान, अनेक ठिकाणी विविध स्पर्धांच आयोजन केले जाते. यावेळी फॅन्सी ड्रेस स्पर्धाही आयोजित करण्यात येते, दरम्यान, प्रत्येक पालकाला आपल्या मुलांना कृष्ण आणि राधा सारख तयार करायचं असत, हा सण साजरा करण्यासाठी अनेक दिवस आधीच तयारी केली जाते. हा सण साजरा करण्यासाठी लोक आपल्या मुलांना राधा आणि कृष्णासारखे कपडे घेतात. तुमच्या परिसरात दहीहंडी किंवा फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित केली जात असेल, तर तुम्ही तुमच्या मुलाला कान्ह्याप्रमाणे सजवू शकता. त्यासाठी धोतर, मोरपंख, बासरी, माळा, मुकुट आदींची आवश्यकता असेल. कृष्ण जन्माष्टमीला तुमचा मुलगा हुबेहूब कान्ह्यासारखे दिसण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या ट्यूटोरियल व्हिडिओंची मदत घेऊ शकता. हे देखील वाचा: Dahi Handi Date 2024: दहीहंडी सणाची तारीख, महत्व आणि साजरा करण्याची पद्धत, जाणून घ्या
व्हिडीओ पाहून, तुमच्या मुलांना तयार करा कृष्ण आणि राधाप्रमाणे
Bal Gopal Dresses for Janmashtami 2024
Bal Gopal Dresses for Janmashtami 2024
Bal Gopal Dresses for Janmashtami 2024
व्हिडीओ पाहून तुम्ही तुमच्या मुलीला किंवा मुलाला बाळकृष्ण सारखे किंवा राधा सारखे तयार करू शकता. व्हिडीओ पाहून तुम्हाला काही आयडिया येईल, की नेमके कसे तयार करायचे.