Apple iPhone 14

Apple iPhone 14: अ‍ॅपलने काही दिवसांपूर्वी  iPhone 14 ची सीरीज लॉंच केली होती. अनेकजण  अ‍ॅपलच्या नवीन फोनची आतुरतेने वाट बघत होते. अ‍ॅपल प्रेमींनी क्षणाचाही विलंब न करता नवीन फोन विकतही घेतला आहे. परंतु   iPhone 14 सीरीज च्या कॅमेऱ्यात एक त्रुटी असुन अनेक युजर्सनी तक्रार केली आहे.  iPhone 14 सीरीजमध्ये नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत, त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, पाहा,  iPhone 14 च्या सीरीजमध्ये कोणत्या अडचणी येत आहोत आणि कंपनीने समोर आलेल्या त्रुटी बद्दल काय सांगितले आहे. ते ही समोर आले आहे, जाणून घ्या 

Apple iPhone 14 Pro आणि iPhone 14 pro Max फोनमधल्या त्रुटी

 Apple च्या iPhone 14 सिरीझमध्ये  कॅमेरासंबंधी एक बग सापडला आहे.

 iPhone 14 सीरीजच्या फोनमध्ये व्हिडीओ कॉलिंग करतांना अनेकांना समस्या येत आहेत. 

फोनमधल्या त्रुटी मुळे  iPhone 14 Pro आणि  iPhone 14 Pro Max चा कॅमेरा चांगल्या दर्ज्याचे व्हिडीओ शूट करत नाही असे समोर आले आहे.

MacRumors ला दिलेल्या निवेदनात अ‍ॅपलच्या प्रवक्त्याने सांगितले आहे की, 'स्नॅपचॅट, टिकटॉक, इंस्टाग्राम सारख्या अ‍ॅप्सचा कॅमेरा वापरताना अनेकांना कॅमेरामध्ये त्रुटी जाणवत आहेत. 

काहींना Phone 14 Pro मध्ये दुसऱ्या अ‍ॅप्सच्या माध्यमातून व्हिडीओ रेकॉर्ड केल्यावर क्वॉलिटी नीट नसल्याचे दिसून आले आहे.

अनेकांना कॅमेऱ्यातून कॅमेरा मोड बदलूनही अस्पष्ट आणि निकृष्ट दर्जाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होत आहे. 

त्रुटीसमोर आल्यानंतर  Apple कंपनीने पुष्टी केली आहे की, पुढील आठवड्यापर्यंत ही समस्या दूर केली जाईल.